गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियात वेगवेगळे चॅलेन्ज धुमाकूळ घालत आहे. काहींना हे चॅलेंजेस चांगलीच महागात पडली आहेत. आता पुन्हा एकदा एक नवं चॅलेन्ज सोशल मीडिया चर्चेचा विषय ठरत आहे. यात लोक कुठेही पडून आपले फोटो काढत आहेत. #fallingstar2018 या हॅशटॅगने हे चॅलेन्ज सुरु आहे.
असे सांगितले जात आहे की, रशियातून या चॅलेन्जची सुरुवात झाली आहे. या चॅलेन्जमध्ये चेहरा जमिनीवर असायला हवा असं नियम आहे.
वरील काही फोटो पाहून तुम्हाला हे नक्कीच वाटलं असेल की, हे चॅलेन्ज श्रीमंतांचंच आहे. कुणी प्रायवेट जेटमधून पडत आहेत, तर कुणी महागड्या कारमधून.
पण या फोटोंचा आनंद सगळेजण घेऊ शकतात. गरीब-श्रीमंत असा काही फरक नाही.