तुम्ही अनेकदा शेतकऱ्याची पत्नी सरकारी कार्यालयात अधिकारी किंवा एखाद्या मोठ्या कंपनीत नोकरीत करत असल्याचे पाहिले असेल. पण, ऑस्ट्रेलियातील एका शेतकऱ्याची पत्नी चक्क ऑनलाइन मॉडेलिंग करते. तिचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. या शेतकऱ्याच्या पत्नीचे म्हणणे आहे की, ती तिचे फोटो चाहत्यांना विकते, ज्यातून तिला आठवड्याला 8 लाख रुपयांपर्यंत कमाई होते.
एकाकीपणावर मात करण्यासाठी ऑनलाइन मॉडेलिंग करायला सुरुवात केली, असे शेतकऱ्याची पत्नी हनी ब्रूक्स सांगितले. तसेच, जेव्हा शेतकरी पती तिच्यापासून दूर असतो, तेव्हा ती असे करते असा तिने दावा आहे. हनी ब्रूक्स (Honeyy Brooks) ऑस्ट्रेलियाच्या व्हिक्टोरिया प्रांतातील ग्रामीण भागात राहते. ती सांगतो की, एकाकीपणावर मात करण्यासाठी तिने सबस्क्रिप्शनवर आधारित साइटवर अकाउंट तयार केले. या साइटवर ती तिचे फोटो विकते.
हनी ब्रूक्सचा पती नेहमी कामानिमित्त दोन आठवडे बाहेर राहतो. यादरम्यान ती शेती आणि कुटुंबाशी संबंधित गोष्टींची काळजी घेते. हनी ब्रूक्स म्हणाली, "मी आई आणि पत्नी आहे. पती बाहेर असतात, पण माझं आयुष्य नॉन स्टॉप चालतं. शेतात राहताना मी गायी, मेंढ्या, शेळ्या, कोंबड्या आणि मांजरांमध्ये व्यस्त असते."
याचबरोबर, हनी ब्रूक्सने सांगितले की, ती आपल्या कामाबद्दल खूप उत्साही आहे. तिला तिच्या कामाचा अभिमान आहे. ती दर आठवड्याला चाहत्यांना नवीन कंटेंन्ट देण्याचा प्रयत्न करते. हनी टिकटॉकवर देखील सक्रिय आहे. तसेच, जेव्हा ती आपल्या चाहत्यांसोबत बिझी नसते, त्यावेळी ती घोडेस्वारी आणि दुचाकी चालविण्यात व्यस्त असते.