आजच्या काळात मुलं खूप प्रगत झाली आहेत. नवनवीन तंत्रज्ञान लगेच आत्मसात करतात. पण जर मुलांना वेळीच शिस्त लावली नाही तर ते मनमानी कारभार करू लागतात. मग त्यांना लहान किंवा मोठ्या लोकांची पर्वा नसते. त्याच वेळी ते इतके हट्टी होतात की ते हट्टीपणाच्या नादात इतर कोणाच्याही शब्दाला महत्त्व देत नाहीत. नुकतीच अशीच एक घटना समोर आली आहे.
एका आत्याने आपल्या भाचीला तिचा लॅपटॉप वापण्यास नकार दिला होता. मुलीला याचं इतकं वाईट वाटलं की तिने स्वतः कार्डबोर्डवर लॅपटॉपचं डिझाइन काढलं. अशीच आणखी एक घटना समोर आली आहे. सध्या एक फोटो सर्वांच लक्ष वेधून घेत आहे. ज्यामध्ये एका मुलाने त्याच्या घराबाहेर एक नोटीस लावली आणि त्यावर तो 2 लाखांत त्याच्या वडिलांना विकत आहे असं म्हटलं. यावरून अनेकांना मुलाच्या नाराजीचा अंदाज आला आहे.
ट्विटरवर याबाबत ट्विट करण्यात आलं असून सध्या ते जोरदार व्हायरल होत आहे. कॅप्शनमध्ये "किरकोळ वाद आणि 8 वर्षांच्या मुलाने त्याच्या वडिलांना विकण्यास सांगणारी नोटीस घरात चिकटवली. मला कळून चुकलं की माझी किंमत नाही" असं म्हटलं आहे. व्हायरल फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, मुलाने त्याच्या घराच्या दारावर 'फादर फॉर सेल' अशी नोटीस लावली आहे.
ज्यामध्ये ठळक अक्षरात मी वडिलांना 2 लाख रुपयांना विकत आहे. कोणाला खरेदी करायचं असेल तर घराची बेल वाजवून करून संपर्क साधावा असं म्हटलं आहे. 2 ऑक्टोबरला शेअर केलेली ही पोस्ट पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत. हजारो व्ह्यूज मिळाले आहेत. याशिवाय नोटीस वाचल्यानंतर युजर्स हसणारे इमोजी शेअर करून त्यांची प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने आज मी इंटरनेटवर पाहिलेली सर्वात मजेदार गोष्ट असं म्हटलं आहे.