लेकीचा मृतदेह खाटेवर ठेवत ३५ किलोमीटर वणवण फिरला बाप; कोणाचाच नाही मदतीचा हात
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2021 03:38 PM2021-05-09T15:38:24+5:302021-05-09T16:07:45+5:30
Father walks 35 km : नातेवाईकांनी पोलिसांना कळवलं पण पोलिसांकडून कोणतंही सहकार्य न मिळाल्यामुळे मृत मुलीचे वडील एकटेच तिला पोस्टमार्टमसाठी रुग्णालयात घेऊन निघाले.
कोरोनाकाळात संपूर्ण जगभरातील लोकांना गंभीर संकटांचा सामना करावा लागत आहे. अशातच एक मन हेलावून टाकणारा व्हिडीओ समोर आला आहे. वडील आपल्या मुलीचा मृतदेह घेऊन जवळपास ३५ किलोमीटर चालत राहिले पण तरीही एकही वाहन उपलब्ध झालं नाही. हा धक्कादायक फोटो समोर आल्यानं सर्वत्र खळबळ पसरली आहे. प्रशासनासह व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केला जात आहे. हा माणूस आपल्या मुलीला घेऊन एकटा का चालत असावा अशा प्रश्न अनेकांना पडला आहे."
ही घटना मध्यप्रदेशातील सिंगरोलीच्या निवास पोलिस स्टेशनच्या गडई गावातील आहे. या ठिकाणी एका १६ वर्षांच्या मुलीनं गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यानंतर नातेवाईकांनी पोलिसांना कळवलं पण पोलिसांकडून कोणतंही सहकार्य न मिळाल्यामुळे मृत मुलीचे वडील एकटेच तिला पोस्टमार्टमसाठी रुग्णालयात घेऊन निघाले. आपल्याला हे जाणून आश्चर्य वाटेल रहिवासी पोलिसांना माहिती मिळाल्यानंतरही गांभीर्य दाखवले नाही.
सिंगरौली में खाट पर सुशासन! पीड़ित पिता बिटिया के शव को पोस्टमॉर्टम के लिये 35 किमी. खाट पर ले जाने को मजबूर परिवार का आरोप ना पुलिस ने किया सहयोग, ना मिला शववाहन @GargiRawat@manishndtv@ndtv@ndtvindia@ManMundra@sushant_sayspic.twitter.com/IJ9LiXDfpB
— Anurag Dwary (@Anurag_Dwary) May 9, 2021
प्रशासनानं निष्काळजीपणा दाखवल्यानं या माणसावर ही वेळ आली. पीडित मुलीसाठी वाहन सापडले नाही. शेवटी वडिलांना खाटेवर आपल्या मुलीला रुग्णालयात घेऊन जावे लागले. 'चल आता निघ इथून', लस घेताना पोरीची नाटकं पाहून भडकले डॉक्टर; पाहा व्हायरल व्हिडीओ
मृत व्यक्तीचे वडील म्हणाले, "काय करावं?, पोलिसांनी सहकार्य केलं नाही. रुग्णवाहिकेसाठी कॉल करूनही व्यवस्था झाली नाही. आम्ही कितीतरी वेळ या यंत्रणेला विनवणी करीत होतो. पण प्रतिसाद न मिळाल्यानं जबरदस्तीने औपचारीकता पूर्ण करण्यासाठी मृतदेह पोस्टमार्टमला खाटेवर घेऊन गेलो.'' बापरे! किचनचा तुटलेला पाईप जोडण्यासाठी प्लंबरनं मागितले ४ लाख; व्हायरल होतोय पावतीचा फोटो