सोशल मीडियावर बाईक स्टंटचे अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. मात्र असे काही व्हिडीओ असतात जे शूट करत असताना रस्त्यावरून चालणाऱ्या सर्वसामान्यांसाठी त्रासाचं कारण बनतात. पण यावेळी एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे, ज्यामध्ये स्टंटबाजांना धडा शिकवण्यासाठी लोकांनी उचललेलं पाऊल सर्वांचंच लक्ष वेधून घेत आहे.
व्हायरल व्हिडीओमध्ये असा दावा केला जात आहे की, हे प्रकरण बंगळुरूच्या नेलमंगला येथील आहे. तरुणांच्या स्टंटबाजीला स्थानिक लोक खूप वैतागले होते. स्टंटबाजांना कंटाळून गावकऱ्यांनी या तरुणांना घेराव घातला आणि त्यांना धडा शिकवण्यासाठी त्यांची स्कूटर फ्लायओव्हरवरून फेकून दिली. हा व्हिडीओ सध्या वेगाने व्हायरल होत आहे.
हा व्हिडीओ बंगळुरूजवळील तुमकूर हायवे फ्लायओव्हरचा असल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात आहे. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, लोकं स्कूटर खाली फेकताना दिसत आहे. ही संपूर्ण घटना एका व्यक्तीने कॅमेऱ्यात कैद केली आहे. या घटनेत कोणीही जखमी झाले नसले तरी सध्या या घटनेची जोरदार चर्चा रंगली आहे.
हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर @bawalhoterhenge अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे, लोकांनी कमेंट सेक्शनमध्ये अनेक प्रकारच्या कमेंट केल्या आहेत. काहींच्या मते अशा घटना रोखण्यासाठी आणखी काही मार्ग असू शकतो. पोलिसांनीही अशा लोकांवर कडक कारवाई करायला हवी होती. व्हिडिओवर कमेंट करताना एका युजरने लोकांनी कायदा हातात घेणं योग्य नाही असं म्हटलं आहे.