इंटरनेटवर पसरत असलेल्या वादविवाद, आरोप-प्रत्यारोपांच्या वातावरणात, व्हायरल झालेल्या एका फोटोने सर्वांचंच मन जिंकलं आहे. कडक उन्हात महिलेने सायकल रिक्षाचालकाच्या डोक्यावर छत्री धरल्याचं स्पष्टपणे दिसत आहे. महिलेची ही माणुसकी पाहून सोशल मीडिया युजर्स महिलेचं भरभरून कौतुक करत आहेत. सोशल मीडियावर याचीच जोरदार चर्चा रंगली आहे.
व्हायरल झालेल्या फोटोमध्ये एक महिला रिक्षात बसली आहे. पण कडक उन्हामुळे रिक्षाचालक अस्वस्थ होत असल्याचे तिला दिसले, मग ती आपल्या डोक्यावरची छत्री त्याच्या डोक्यावर धरते जेणेकरून वृद्ध रिक्षाचालकाला सावली मिळेल. हा हृदयस्पर्शी फोटो आता वेगवेगळ्या कॅप्शनसह इंटरनेटवर शेअर केला जात आहे. आता युजर्स त्या महिलेचे कौतुक करत आहेत कारण तिने छत्रीच्या मदतीने भर दुपारी एका रिक्षाचालकाला दिलासा देण्याचा प्रयत्न केला.
आजतकच्या तपासात हा व्हायरल फोटो उत्तर प्रदेशातील बुलंदशहरच्या कलाआम येथे क्लिक करण्यात आल्याचे समोर आले आहे. शनिवारी 40 अंश सेल्सिअस तापमानामुळे जिल्ह्यातील लोकांना त्रास होत असल्याचा दावा एका ट्विटर युजरने केला आहे. याच दरम्यान, शिक्षिका हुमा घरी जात होती. रिक्षावाल्याचं लक्ष उन्हामुळे विचलित होताना दिसल्यावर तिने त्याच्या छत्री डोक्यावर ठेवली. मानवतेपेक्षा मोठा कोणताही धर्म नसतो असं लोक म्हणत आहेत. आजतकने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"