साप आणि मुंगूस यांच्यातील शत्रूत्व सर्वश्रुत आहे. दोघंही जेव्हा एकमेकांसमोर उभे ठाकतात तेव्हा दोघांमध्ये थरारक द्वंद्व निर्माण होतं. एका बाजूला साप आपल्या विषारी अस्त्रानं मुंगूसावर हल्ला चढवतो, तर चपळतेच्या जोरावर सापाला जेरीस आणण्यासाठी मुंगूस ओळखला जातो. त्यामुळे दोघांमध्ये होणारी लढाईचे अनेक प्रसंग आपण आजवर पाहिले असतील. असाच एक लढाईचा थरार समोर आला आहे. साप आणि मुंगूसाच्या लढाईचा एक व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल झाला आहे. (fight between snake and mongoose see who win who lost in video)
एक मोठा साप आणि मुंगूस एकमेकांसमोर आल्यानं नेमकं काय होतं ते या थरारक व्हिडिओतून लक्षात येतं. सापाला पाहताच मुंगूसानं त्याच्यावर हल्ला चढवला. तर सापानंही जोरदार प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली. मुंगूस त्याच्या ऊर्जा आणि चपळतेनं सापाला माघार घेण्यास भाग पाडताना या व्हिडिओतून दिसून येत आहे. अखेरीस मुंगूसाच्या तावडीतून सुटण्यासाठी साप पळ काढताना दिसून येतो.
साप आणि मुंगूसाच्या लढाईत नेहमी मुंगूस सापावर भारी ठरतो हे आपण आजवर पाहिलं आहे. याही व्हिडिओतच तसंच काहीसं दिसून येत आहे. मुंगूस एकहाती सापावर वरचढ ठरताना दिसतोय. साप वारंवार मुंगूसाच्या हल्ल्यापासून स्वत:ची सुटका करुन घेण्यासाठी पळ काढत असल्याचं दिसून येतं. सापाकडून सुरुवातीला प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला गेला असला तरी मुंगूस सापाच्या शेपटीवर वारंवार हल्ला चढवताना दिसून येतो. अखेर साप तिथून पळ काढण्यात यशस्वी होतो आणि बिळात शिरतो.
साप आणि मुंगूसाच्या थरारक लढाईचा हा व्हिडिओ भारतीय वन सेवेचे (IFS) अधिकारी सुशांत नंदा यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर ट्विट केला आहे. त्यानंतर हा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आहे.