तुम्हाला कार्टून (Cartoon) बघायला आवडतात का? आवडत असेल तर आज हा खास ट्रेंड तुमच्यासाठी आहे. सध्या ऑप्टिकल इल्युजनचे (Optical Illusion) फोटो खूप व्हायरल होत आहेत. त्यातच गेल्या काही दिवसांपासून कार्टून असलेले ऑप्टिकल इल्युजनचे फोटो ट्रेंड करत आहेत. या फोटोंमध्ये तुम्हाला एखादा प्राणी, पक्षी किंवा वस्तू शोधायची असते. आजचाही फोटो असाच आहे. या फोटोत तुम्हाला गायींच्या कार्टूनमध्ये लपलेल्या एक कुत्रा शोधायचा आहे.
हा फोटो तुम्ही 30 सेकंदांत शोधू शकलात तर तुमच्यासारखे स्मार्ट फक्त तुम्हीच. Tama या कंपनीने हा ऑप्टिकल इल्युजनचा फोटो तयार केला आहे. या फोटोत तुम्हाला गायींच्या कार्टूनमध्ये दडलेला एक कुत्रा शोधायचा आहे. तुम्ही बारीक लक्ष देऊन या फोटोचं नीट निरीक्षण केल्यास तुम्हाला हा कुत्रा सापडेल. नीट लक्ष देऊन एकेक गाय बघा, सगळ्याच गायी सारख्या दिसत आहेत की नाही तेही बघा म्हणजे त्यावरून तुम्हाला अगदी सहज कुत्रा शोधता येईल. खरं तर हा कुत्रा शोधणं फार अवघड नाही, फक्त त्यासाठी तुमची नजर तीक्ष्ण असायला हवी. एकाग्रतेने तुम्ही या फोटोमध्ये कुत्रा शोधल्यास तो नक्की सापडेल.
शोधताय ना? आता जरा थांबा, आम्ही तुमचं काम आणखी सोपं करतो. तुम्ही जो कुत्रा शोधताय तो कसा दिसतो, याबद्दल तुम्हाला थोडी माहिती देऊन आम्ही तुमची मदत करतो. तुम्ही जो कुत्रा शोधताय ना त्याचा रंग काळा आहे. तसेच तुम्ही कुत्रा ओळखण्यासाठी गाय आणि कुत्र्याच्या चेहऱ्यात काय फरक आहे, याचा विचार करा, तो फरक समजून घ्या आणि नंतर शोधा. हा फोटो सध्या सोशल मीडियावर खूप ट्रेंड करतोय. अनेकांना हा कुत्रा शोधूनही सापडला नाही. तर काहींना अगदी काही सेकंदात कुत्रा ओळखता आला. अनेकांनी सोशल मीडियावर हा फोटो शेअर करत यातला कुत्रा शोधून दाखवण्यात मदत मागितली. तर ज्यांना या फोटोतला कुत्रा ओळखता आला ते आपल्या मित्रमैत्रिणींसोबत (Friends) हा फोटो शेअर करत त्यांना हे कोडं सोडवायला म्हणजेच कुत्रा शोधायला सांगत आहेत.
किती वेळापासून कुत्रा शोधताय, सापडला की नाही. नसेल सापडला तर एक शेवटचा संकेत तुमच्यासाठी. तुम्ही चौथ्या रांगेत हा कुत्रा शोधून पाहा, जर तुम्ही नीट लक्ष देऊन पाहिलंत तर सापडेल. सापडला तर कमेंट करून नक्की सांगा आणि शोधूनही सापडला नाही, तर मित्रमैत्रिणींची मदत घ्या.