अमेरिका, चीन, रशियासारखे देश अफलातून शोध लावत आहेत. आपण अनेकदा, सिनेमांमध्ये हिरो किंवा व्हिलन स्टंट करताना पाहतो. हे काही खरे नसते तर मागे हिरव्या रंगात कापड लावून ते शूट केलेले असते नंतर ग्राफिक्सचा वापर करून ते रंगविले जाते. अनेक गोष्टी आपण कपोलकल्पित असतात. बसल्या बसल्या माणूस पायांना किंवा हातांना लावलेल्या मशीनने उडून जावा असे वाटते. हे आता प्रत्यक्षात आले आहे. एक नौदलाच्या जवानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. तो जेटपॅकद्वारे उडताना दिसत आहे.
समुद्राच्या लाटा खूप उसळत असल्याचं या व्हिडिओत दिसत आहे. एवढ्यात तो सैनिक एका छोट्या बोटीतून उडतो आणि दुसऱ्या बाजूच्या जहाजाच्या दिशेने जातो. लाटा खूप उसळत आहेत, पण त्यांची पर्वा न करता तो आरामात दुसऱ्या जहाजाच्या दिशेने उडत जातो.
जहाजावर गेल्यावर मग तो आपले हात पसरून त्या जहाजावर आरामात उतरतो. या यंत्राला जेटपॅक्स म्हणतात आणि ही एक प्रकारची भविष्यातील मोटरसायकल आहे. ज्याला एखादी व्यक्ती खांद्यावर टांगून प्रवासाला सुरुवात करेल. या व्हिडीओला लाखो व्हूव्ज मिळाले आहेत.