आता बातमी आहे मध्य प्रदेशच्या ग्वाल्हेरची. येथे एक ९० वर्षी वृद्ध थंडीने कुडकुडत होते. गल्लीगल्लीमध्ये भीक मागून रस्त्याकडेला राहत होते. त्यांची हालत खूप खराब होती. जेव्हा चौकशी केली तेव्हा ते आयआयटी कानपूर पासआऊट असल्याचे समजल्याने धक्काच बसला. त्यांचे नाव सुरेंद्र वशिष्ठ आहे आणि त्यांचे वय जवळपास ९० असल्याचे सांगितले जात आहे.
योगायोग म्हणजे गेल्याच महिन्यात ग्वाल्हेरमध्ये अशीच एक घटना घडली होती. रस्त्याच्या कडेला पोलिसांना एक भिकारी दिसला. थंडीत कुडकुडणाऱ्या त्या व्यक्तीला पोलिसांनी मदतीचा हात दिला. मात्र त्या भीक मागणाऱ्या व्यक्तीला नीट पाहिल्यानंतर आणि अधिक चौकशी केली असता पोलिसांना मोठा धक्का बसला. मिळालेल्या माहितीनुसार, ग्वाल्हेरमधील पोट निवडणुकीच्या मतमोजणी नंतर दोन पोलीस अधिकारी मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर परतत होते. त्याचवेळ त्यांना रस्त्याच्या कडेला थंडीने कुडकुडत असलेला एक भिकारी दिसला. पोलिसांनी गाडी थांबवली. त्या व्यक्तीला जॅकेट दिलं, बूट दिले. भिकाऱ्याची अवस्था पाहून त्यांन तो मनोरुग्ण असल्याचं समजलं. पोलिसांना यापूर्वी या माणसाला कुठेतरी पाहिल्यासारखंही सतत वाटत होतं. चौकशी केल्यावर त्यांना मोठा धक्का बसला. कारण हा भिकारी त्यांच्याच बॅचचा पोलीस ऑफिसर असल्याचं त्यांना आठवले होते. ही व्यक्ती मनीष मिश्रा होती.
असाच काहीसा प्रकार पुन्हा घडला आहे. टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार आयआयटी पासआऊट सुरेंद्र यांना एका संघटनेने मदत केली आहे. याच संघटनेने मनीष मिश्रा यांनाही मदत केली होती. आश्रम स्वर्ण सदनसोबत असलेल्या विकास गोस्वामी यांनी सांगितले की, आम्ही सुरेंद्र यांना बस स्टँडजवळ खूप वाई परिस्थितीत पाहिले. त्यांच्यासोबत जेव्हा बोलायला सुरुवात केली तेव्हा त्यांनी इंग्रजीत बोलण्यास सुरुवात केली. त्यांना आम्ही समजावून आश्रमात घेऊन आलो. त्यांच्या घरच्यांशीही बोलायचा आम्ही प्रयत्न केला.
थंडीनं कुडकुडत होता भिकारी; मदतीसाठी धावला अधिकारी अन् समोर आली धक्कादायक माहिती
सुरेंद्र यांनी आश्रमातील लोकांना सांगितले की, 1969 मध्ये त्यांनी कानपूरमध्ये मॅकेनिकल इंजिनिअरिंगचा अभ्यास केला होता. १९७२ मध्ये त्यांनी एलएलएम केले होते. त्यांचे वडील जेसी मिलमध्ये सप्लायर होते. ही कंपनी नंतर बंद पडली.
मनीष मिश्राही होत आहेत रिकव्हरडीएसपी रत्नेश तोमर आणि विजय भदौरिया यांना रस्त्यात भिकारी दिसला होता. मनीष मिश्रा असं या व्यक्तीचं नाव आहे. ते गेली 10 वर्षं अशाच अवस्थेत फिरत आहेत. 1999 सालच्या बॅचचे ते पोलीस अधिकारी होते आणि त्या वेळी अचूक नेम साधणारा निशाणेबाज म्हणून ते प्रसिद्ध होते. त्यांनी मध्य प्रदेशात वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात पोलीस अधिकारी म्हणून काम केलं. पण 2005 च्या सुमारास त्यांना मानसिक त्रास सुरू झाला. या आजाराने त्यांची मानसिक स्थिती बिघडली. आता ते देखील याच संस्थेच्या मदतीने बरे होत आहेत.