सोशल मीडिया एक गाईचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. ही घटना स्वित्जरलँडच्या पर्वतीय भागातील आहे. या ठिकाणी एक गाय जखमी अवस्थेत अडकली होती. एका रिपोर्टनुसार या गाईला दुखापत झाली असल्यामुळे लंगडत चालत होती. चालण्यासाठी त्रास सहन करावा लागत होता. अशा स्थितीत शेतकऱ्यानं गाईला सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी हॅलिकॉप्टरची मदत घेतली आहे.
ही संपूर्ण घटना कॅमेरात कैद झाली आहे. तुम्ही या फोटोमध्ये पाहू शकता एअरलिफ्टच्या साहाय्यानं गाईला उचलण्यात आलं आहे. ही गाय कोणतीही हालचाल करताना दिसत नाहीये. सोशल मीडिया युजर्सनी या व्हिडीओ खूप पसंती दिली आहे.तसंच या गाईला वाचवण्यासाठी खटाटोप करत असलेल्या शेतकऱ्याचंही कौतुक केलं जात आहे.
या रेस्क्यू ऑपरेशनचा फोटो एबीसी न्यूजनं ट्विटरवर शेअर केला आहे. यात असं कॅप्शन लिहिलं आहे की, जेव्हा गाय उडू लागते. स्वित्जलँडच्या एका शेतकऱ्यानं आपल्या गाईला वाचवण्यासाठी हेलिकॉप्टरची मदत घेऊन गाईला उचललं आहे. एल्प्स पर्वतांमध्ये फसल्यानं गाईला दुखापत झाली. गाईला जास्त त्रासाचा सामना करावा लागू नये म्हणून प्रसंगावधान दाखवून हेलिकॉप्टर बोलावून घेतले आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओला आतापर्यंत ९ हजारांपेक्षा जास्त लाईक्स आणि २ हजारांपेक्षा जास्त कमेंट्स आल्या आहेत.
हे पण वाचा-
याला म्हणतात देशभक्ती! भिक्षा मागणाऱ्या बाबांनी कोरोना रुग्णांसाठी दिले ९० हजार दान
सॅल्यूट! अनवाणी पायांनी कर्तव्य करणाऱ्या ट्रॅफिक पोलिसाला पाहून तुम्हीही ठोकाल सलाम