सोशल मीडियावर बरेच व्हिडिओ व्हायरल होतात. कधीकधी प्राणी आणि कधीकधी माणसांचे हे व्हिडिओ आश्चर्यचकित आणि मनोरंजन देखील करतात. सध्या सोशल मीडियावर एका वनविभागातील गार्डचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक माणूस खांद्यावर बसलेल्या छोट्या हत्तीला घेऊन धावत आहे. हा व्हिडिओ पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत आणि त्या व्यक्तीला खरा 'बाहुबली' असल्याचं म्हटलं आहे.
हा व्हिडिओ २०१७ चा असल्याच सांगितलं जात आहे. छोट्या हत्तीला घेऊन खांद्यावर धावणारी व्यक्ती म्हणजे वनरक्षक पलानीचमी. गेल्या काही वर्षांत पलानीचामीचे अनेक फोटो इंटरनेटवर व्हायरल झाले आहेत. आता, वन रक्षकाचा एक व्हिडिओ या आठवड्याच्या सुरूवातीस भारतीय वन सेवेचे अधिकारी सुशांत नंदा यांनी ट्विटरवर पोस्ट केला आहे.
नादच खुळा! या शेतकऱ्यांची कमाई ऐकून तुम्हीही आजचं सोडाल नोकरी; असं पिकवतात तरी काय? जाणून घ्या
डिसेंबर २०१७ मध्ये हत्तीचं पिल्लू चुकून खड्ड्यात पडलं. त्यानंतर ज्याला पलानीचामीने वाचवले. वनरक्षकाने वासराला त्याच्या खांद्यावर उभे केले आणि त्याची आईशी ओळख करुन दिली. सुशांत नंदाने पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये घटनेची झलक दिली गेली आहे.
दणका! मास्क नाही म्हणून पोलिसांनी हातावर मारला 'असा' शिक्का, जेल मध्ये लिहायला लावला निबंध
हा व्हिडिओ पोस्ट करत सुशांत नंदाने कॅप्शनमध्ये लिहिले आहे. “बाहुबली. कालव्यात पडल्यानंतर हत्ती चिखलात अडकला. अधिकाऱ्यांनी हत्तीला मेट्टूपलायमच्या जंगलापासून वाचवले होते. पण त्यानंतर हे हत्तीचं पिल्लू आईपासून लांब गेलं होतं. यानंतर वेळ न घालवता पलानीचामी सारथकुमार यांनी हत्तीच्या पिल्लाला उचलून आपल्या कळपात सामील केले. "