इंन्सानियत के पटाकेने जबडे को उडाया!,हत्तीणीच्या मृत्यूनंतर वनअधिकाऱ्याची हृदयस्पर्शी कविता

By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2020 03:26 PM2020-06-04T15:26:41+5:302020-06-04T15:39:05+5:30

हा व्हिडीओ  सोशल मीडियावर पोस्ट करणारे अभिषेक शर्मा हे मध्य प्रदेशातील वनविभागात कार्यरत आहे.

Forest officer share emotional lines for elephant killed in kerala video goes viral | इंन्सानियत के पटाकेने जबडे को उडाया!,हत्तीणीच्या मृत्यूनंतर वनअधिकाऱ्याची हृदयस्पर्शी कविता

इंन्सानियत के पटाकेने जबडे को उडाया!,हत्तीणीच्या मृत्यूनंतर वनअधिकाऱ्याची हृदयस्पर्शी कविता

Next

केरळ मधील घटनेने सगळ्यांनाच हादरवलं आहे. केरळमधील भूकेने व्याकुळ असलेली गर्भवती हत्तीण काहीतरी खायला मिळेल या आशेनं केरळ येथील मलाप्पूरम येथील एका वसाहतीत गेली. तेथील लोकांनी तिला अननसातून फटाके खायला दिले. अननसाचं आवरण असलेल्या पदार्थात स्थानिकांनी पेटते रॉकेट, बॉम्ब ठेवले होते. भुकेल्या हत्तीणीला हे समजण्यात विलंब झाला आणि तिनं तो पदार्थ अननस म्हणून खाल्ला. त्यानंतर तिच्या तोंडात फटाक्यांचा स्फोट झाला. असह्य वेदनेसह ती तेथून पळाली आणि एका नदीत जाऊन उभी राहिली.  या घटनेनंतर सोशल मीडियावर  मोठ्या प्रमाणावर संताप व्यक्त केला जात आहे.

या घटनेच्या पार्श्वभूमीवर वनअधिकारी अभिषेक शर्मा यांनी गर्भवती हत्तीणीसाठी सोशल मीडियावर एक कविता शेअर केली. ही कविता ऐकून तुमचे डोळे नक्की पाणावतील. हा व्हिडीओ  सोशल मीडियावर पोस्ट करणारे अभिषेक शर्मा हे मध्य प्रदेशातील वनविभागात कार्यरत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ पाहून  लोक या घटनेबाबत दुः ख व्यक्त करत आहेत. 

हा व्हिडीओ पोस्ट करत असताना या व्यक्तीने कॅप्शन लिहिले आहे की, केरळमधील एका गर्भवती हत्तीणीला फटाक्यांनी भरलेले अननस खायला घातले, ज्यामुळे या हत्तीला वेदना असहय्य होऊन आपली जीव गमवावा लागला, सरळ प्रश्न आहे. आपण माणसं आहोत आणि ती जनावरं? याचा वाईट परिणाम तर होत नाही ना.  हा व्हिडीओ अभिषेक यांनी ३ मे ला शेअर केला आहे. आत्तापर्यंत या व्हिडीओला १.२ मिलियन व्हिव्ह्ज आणि ४१ हजारांपेक्षा जास्त शेअर्स मिळाले आहेत.

मला माफ कर बाळा! गर्भवती हत्तीणीच्या मृत्यूनंतर सोशल मीडियावर उसळली संतापाची लाट...

Kerala Elephant Death: केरळमध्ये आणखी एका हत्तीची हत्या?; फटाक्यांचाच वापर केल्याचा संशय

Web Title: Forest officer share emotional lines for elephant killed in kerala video goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.