शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपचा मोठा निर्णय; नितीन नबीन यांची राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती, जेपी नड्डांची जागा घेणार
2
Sydney Shooting: समोर मृत्यू नाचत होता, पण तो घाबरला नाही; गोळीबार करणाऱ्या पकडले अन्...
3
औसा-वानवडा रस्त्यावर जळीतकांड; कारसह तरुणाचा झाला कोळसा, घातपाताची शक्यता
4
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
5
गोव्यावरून कोल्हापुरात आली आणि रंकाळा तलावात...; गर्भवती नेहा पवार यांच्यासोबत काय घडलं?
6
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
7
Grand Vitara-Hyryder चे वर्चस्व धोक्यात; 28.65 Kmpl मायलेज देणारी Hybrid SUV ठरली गेमचेंजर
8
IND vs SA Live Streaming 3rd T20I : सूर्या-गिलवर असतील नजरा! कुठं पाहता येईल तिसरा टी-२० सामना?
9
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
10
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
11
भारतानंतर आता दक्षिण आफ्रिकेनेही सुरू केली बांग्लादेशी घुसखोरांविरुद्ध हद्दपारीची मोहीम
12
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
Daily Top 2Weekly Top 5

४६ तासांच्या रेल्वे प्रवासात परदेशी पर्यटक वैतागला, सगळ्यांना सांगत सुटला- आता घरी जातो कारण..

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2025 15:47 IST

सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यात दिसतं की, एका विदेशी पर्यटकांना भारतात फिरण्यासाठी रेल्वेचा ४६ तास प्रवास केला.

जगभरातील देशांमधून लाखो पर्यटक दरवर्षी भारतात फिरण्यासाठी येतात. येथील संस्कृती, इतिहास, राहणीमान जाणून घेण्याची त्यांना उत्सुकता असते. तसेच भारतीय पदार्थांची टेस्टही घेतात. हे पर्यटक व्हिडीओ तयार करून त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअरही करतात. या लोकांना भारतातील लांबच लांब रेल्वे प्रवासही आवडतो. पण एका विदेशी पर्यटकासाठी हाच रेल्वे प्रवास एखाद्या वाईट स्वप्नासारखा ठरला आहे.  

सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यात दिसतं की, एका विदेशी पर्यटकांना भारतात फिरण्यासाठी रेल्वेचा ४६ तास प्रवास केला. पण यानंतर या पर्यटकानं इतर पर्यटकांसाठी भारत फिरण्याबाबत एक इशारा जारी केला. त्यानं भारतीय रेल्वे प्रवासाचं डर्टी सीक्रेट उघड केलं आणि म्हणाला की, मला घरी जायचं आहे. या व्यक्तीचं नाव व्हिक्टर ब्लाहो असून तो एक फ्रान्सचा यूट्यूबर आहे.

व्हिक्टरनं भारतात ४६ तास रेल्वेनं प्रवास केला. जो त्याच्यासाठी फारच अवघड होता. हा प्रवास मुंबईहून सुरू झाला, नंतर वाराणसी, आग्रा आणि शेवटी दिल्ली असा होता. व्हिक्टरनं  स्लीपरपासून ते थर्ट एसीपर्यंत वेगवेगळ्या कोचमध्ये प्रवास केला. पण त्याचा अनुभव खूपच वाईट होता. त्यानं इतर विदेशी पर्यटकांना सांगितलं की, भारतात लांब प्रवासासाठी रेल्वेनं जाणं टाळा. त्यानं व्हिडिओतून या प्रवासाचे सगळे क्षण दाखवले. तो म्हणाला की, भारतातील जीवन खूपच धकाधकीचं आहे. रेल्वेडे डबे प्रवाशांनी खचाखच भरलेले होते आणि इतका आवाज होता की, शांतपणे बसणं अवघड झालं होतं. प्रवासादरम्यान त्याला रेल्वेत उंदिरही दिसला आणि झुरळही. त्यानंतर त्यानं रेल्वेतील कचराही दाखवला. ज्याच्या दुर्गंधीमुळं  त्याला त्रास होत होता.

व्हिडीओ पोस्ट करत याचं शीर्षक "भारतात रेल्वेनं ४६ तास प्रवास करू नका - मला खूप त्रास झाला" असं दिलं आहे. व्हिक्टरचा त्रास इथेच थांबला नाही. एका दुसऱ्या प्रवाशानं त्याच्यासोबत जबरदस्तीनं बोलणं सुरू केलं. या व्यक्तीचं व्हिक्टरचं त्याच्या गर्लफ्रेन्डसोबत व्हिडीओ कॉलवर बोलणं करून दिलं. नंतर व्हिक्टरनं कसातरी त्याच्याकडून पिच्छा सोडवला. तो म्हणाला की, "मी भारतात तीन आठवडे आहे. आता मला घरी जायचं आहे. मला शांतता हवी आहे, आराम हवा आहे. स्वच्छ बेडची गरज आहे".

ब्लाहोनं इन्स्टाग्रामवर याबाबत एक पोस्ट लिहिली. त्यानं परदेशी पर्यटकांना सल्ला दिला की, "मला त्रास ओढवून घेण्याची सवय नाही. माझ्या चुकांमधून शिका. जर तुमच्याकडे पैसे असतील तर रेल्वेच्या सगळ्यात महागड्या कोचचं तिकीट खरेदी करा".

व्हिक्टरचा हा व्हिडीओ यूट्यूबवर व्हायरल झाला आहे. लोक या व्हिडिओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. काहींना त्याच्या तक्रारी खऱ्या असल्याचं म्हटलं तर काहींनी हीच भारतीय रेल्वेची खरी मजा आहे असं म्हटलं.  

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके