करड्या, हिरव्या आणि अगदी पिवळ्या रंगाची बेडकंही (Frog video) तुम्ही पाहिली असतील. पण कधी चमचमणारं बेडुक पाहिलं आहे का? सध्या अशाच एका बेडकाचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral video) होतो आहे. ज्याच्या पोटात चक्क लाइट पेटते आहे (Lightning frog video). हा कोणता खेळण्यातील बेडुक नाही तर जिवंत बेडुक आहे.
भिंतीवर चिकटलेल्या या बेडकाने सर्वांनाच आश्चर्यचकीत केलं आहे. ज्याच्या पोटात लाइट पेटते आहे (Light in frog stomach). बेडकाच्या पोटात लाइट, हे कसं शक्य आहे, असंच तुम्ही म्हणाला. आता पोटात अशी लाइट पेटणारी बेडकाची वेगळी प्रजाती असते का? असा प्रश्नही तुम्हाला पडला असेल.
@gunsnrosesgirl3 नावाच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. प्रत्येकाने या बेडकाच्या पोटात लाइट का पेटत असावी, याचे तर्कवितर्क लावले आहेत. एका युझरने बेडकाने मोबाईल फोन गिळला असावा ज्याची ही फ्लॅश लाइट असावी असं म्हटलं आहे. तर युझरने तर हा बेडुक दुसऱ्या ग्रहावरील असावा असं म्हटलं आहे. अशा बऱ्याच मजेशीर प्रतिक्रिया या व्हिडीओवर येत आहेत.
तर या चमकणाऱ्या बेडकाचं नेमकं सत्य काय आहे ते आपण पाहुयात. पोस्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार या बेडकाने काजवा गिळला आहे. हा काजवा त्याच्या पोटात चमकतो आहे. काजवा पोटात जसा चमकतो, तसा त्याचा प्रकाश या बेडकाच्या पोटातून बाहेर पडतो. ज्यामुळे जणू हा बेडुक लाइटवाला बेडुक आहे, असंच वाटतं.