आपण अनेकदा भाजीपाला घेण्यासाठी बाजारात जातो, भाजी किंवा फळ घेताना ते आपण व्यवस्थित निवडून घेतो, जेणेकरुन खराब फळं वा भाजी आपल्याला मिळू नये. मात्र, एवढं करुनही बऱ्याचदा दुकानदार खराब मालच आपल्याला खपवतात. हातचलाखी करुन ते चांगल्या मालासोबत खराब माल मिक्स करुन टाकतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्या महिला दुकानदार हातचलाखी दाखवताना दिसते आहे.
व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत एक महिला रस्त्यावर ठेला लावून फळ विकताना दिसते आहे. तिथं उभा असलेला ग्राहक तिला फळं निवडून प्लास्टिक बॅगमध्ये टाकून देतो, मात्र, तेवढ्यात ही महिला हातचलाखी करत, पिशवीतील चांगली फळं खराब फळांसोबत बदलते. इतक्या सराईतपणे ही हातचलाखी करते की, बाजूला उभ्या असलेल्या कुणालाही तिचं हे कृत्य लक्षात येत नाही.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ पाहिल्यानंतर कमेंटमधून नेटकरी आपला राग व्यक्त करत आहे. एका युजरने लिहलं, या मावशींनी आपलं काम इतकं चालाखपणे केलं की तिथं कुणाच्याही लक्षात आल नाही. तर दुसऱ्याने लिहलं, यापुढे मी भाजीपाला घेताना नजर कायम भाजीविक्रेत्यावरच ठेवणार आहे. अनेकांनी वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर हा व्हिडीओ शेअरही केला. त्यामुळे तुम्हीही जेव्हा कुणाकडून काही विकत घेत असाल, तर वस्तू घेण्याआधी तपासूनच घ्याच.