आपल्यापैकी अनेकांना टीव्हीपेक्षा (television) प्रत्यक्ष स्टेडियमवर (stadium) जाऊन कुठल्याही खेळाचे (sports) सामना पाहायला आवडतात. स्टेडियमवर प्रत्यक्ष जाऊन मॅच (watching match)पाहण्यात वेगळा आनंद तर मिळतोच शिवाय, तिथं ज्या गमतीजमती होतात त्या अतिशय भन्नाट असतात. स्टेडियममध्ये मॅच बघायला आलेल्या अशाच एका तरूणीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ज्यात ही तरूणी स्टॅन्ड्समध्ये बसून मॅच पाहतेय, आणि तिच्याकडे आलेला बॉल (ball)पकडायला गेल्यावर तिची चांगलीच फजिती झालीय. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर तो जबरदस्त व्हायरल होतोय. नेटिझन्स या तरूणीचे हावभाव पाहून हसून बेजार झालेत. ( funny video of a young woman catching ball during baseball match is going viral)
व्हिडीओमध्ये एक तरूणी आपल्या मित्रांसोबत बेसबॉलची मॅच पहायला आली आहे. यावेळी खेळाडूने मारलेला बॉल तिच्या दिशेने येतो, ती बॉल पकडण्यासाठी उत्साहित होऊन पुढे येते आणि कॅच पडणार तेवढ्यात तिच्या समोर असलेला छोटा मुलगा बॉल पकडतो आणि या तरुणीची फजिती होते.
सुरूवातीला आपण कॅच पकडणारच असा आत्मविश्वास तरूणीच्या चेहऱ्यावर असतो, पण तेवढ्यात समोरचा मुलगा कॅच पकडतो आणि तिच्या चेहऱ्याचा रंगच बदलून जातो. तरूणीची फजिती झाल्याने तिच्यासोबत आलेले तिचे मित्र जोरजोरात हसू लागतात आणि त्यामुळे ही मुलगी शरमेनं लाल होते.
तरूणीच्या शेजारी बसलेला तिच्या मित्राने तर तिच्या फजितीची पूर्ण मजा घेतली. पण नंतर एका चांगल्या मित्राप्रमाणे तिच्या खांद्यावर हात ठेवत, ”जाऊदे, असं होत असतं. वाईट वाटून घेऊ नको”, असं म्हणत तिची समजूत काढली.
या तरूणीच्या फजितीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटिझन्सही या व्हिडीओला पाहून खळखळून हसले. अनेकांनी त्यावर कमेंट्सही केल्या आहेत. ‘गजब बेज्जती हो गई यार’, ‘वाह बेटे मौज कर दी’ अशा काही मजेशीर कमेंट्स या व्हिडीओखाली आल्या आहेत. या व्हिडीओला इन्स्टाग्रामवर आतापर्यंत 1 लाख व्ह्यूज आले आहेत तर अनेकांनी तो आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअरही केला आहे.