नवी दिल्ली - सोशल मीडियावर रोज नवनवीन अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. यामध्ये अनेक मजेशीर व्हि़डीओ देखील पाहायला मिळतात. नेटकरी सर्व व्हिडीओ एन्जॉय करतात. काही व्हिडीओ पाहून आपण पोट धरून हसतो. त्यामध्ये असलेल्या गोष्टींमुळे हसूच आवरत नाही. सध्या असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक व्यक्ती खोटं बोलताना दिसत आहे. पण तो इतकं बिनधास्त खोटं बोलत आहे. जे पाहून समोरच्यांना काही वेळासाठी का होईना खरं वाटेल. सध्या या व्हिडीओची सर्वत्र जोरदार चर्चा रंगली आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या व्यक्तीने त्याला हुंड्यामध्ये सासरच्या मंडळींनी ट्रेन ऑफर केली होती असं सांगितलं आहे. याशिवाय हे सर्व सत्य असल्याचंही तो म्हणतो. दुसरी व्यक्ती त्याला विचारते की, मग तू ट्रेन का घेतली नाहीस? यावर ती व्यक्ती म्हणते की, मला ट्रेन चालवता येत नाही. म्हणून मी ती घेण्यास नकार दिला. याशिवाय ट्रेन उभी करायला माझ्या इथे जागा देखील नाही. त्यामुळे ट्रेन घेण्यास नकार दिल्याचं तो सांगतो.
इन्स्टाग्रामवर एका अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. व्यक्तीने दिलेलं उत्तर ऐकून नेटकरी पोट धरून हसत आहेत. आतापर्यंत या व्हिडीओला 8 लाख 24 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. यावर अनेकांनी भन्नाट, मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर एका नेटकऱ्याने त्याच्याच अंदाजात म्हटलं की, मलाही हुंड्यात एक रॉकेट मिळणार होतं, हवं तर घेऊ शकलो असतो. मात्र बाईकवर फिरण्याची वेगळीच मजा आहे. तर आणखी एक युजरने याने खोटं बोलण्याच्या सर्वच मर्यादा ओलांडल्या असं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.