शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड, दोन तास प्रवाशांचा जीव टांगणीला, अखेर सुरक्षित लँडिंग
2
न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा; बुमराहला पुन्हा उप कॅप्टन्सीचा मान
3
MPSC विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; 'या' दोन परीक्षांबाबत आयोगाने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय!
4
राजेगटाचं अखेर ठरलं! संजीवराजेंच्या नेतृत्वात तुतारी हाती घेणार; रामराजे नक्की काय करणार?
5
अभिनेते सयाजी शिंदे यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश, मिळाली मोठी जबाबदारी
6
"माझं केवळ त्याच्या पेन्शनवर प्रेम होतं’’, लव्ह ट्रँगलमधून ३५ वर्षाच्या प्रेयसीने वृद्धाची केली हत्या
7
१२० मिनिटांचा थरार, समोर होता मृत्यू, पण वैमानिकानं दाखवलं प्रसंगावधान, असं उतरवलं विमान 
8
ऑस्ट्रेलियाविरूद्ध कसोटी मालिकेला रोहित शर्मा मुकणार? कर्णधार, सलामीवीरासाठी 'ही' नावं चर्चेत
9
महिलांसाठी दिलासादायक बातमी: 'लाडकी बहीण'साठी अर्ज करण्याची मुदत वाढवली, 'ही' असेल शेवटची तारीख!
10
तू ही जरियाँ.. तू ही मंजिल है...! 'अ‍ॅनिमल' फेम तृप्ती डिमरीच्या फोटोंची सोशल मीडियावर चर्चा
11
"काम करणारा भाऊ पाहिजे की, ### बनवणारी...", स्नेहल जगतापांबद्दल गोगावलेंचं वादग्रस्त विधान
12
पोटच्या मुलाला भेटण्यासाठी धडपडणाऱ्या आईची तिच्या पतीनेच भररत्यात गळा चिरून केली हत्या 
13
क्रिकेटच्या खेळातील ४ महत्त्वाच्या नियमांमध्ये बदल! नव्या हंगामापासून लागू होणार नवे नियम
14
बोपदेव घाट बलात्कार प्रकरण: पोलिसांनी आतापर्यंत किती आरोपींना अटक केलीये?
15
"उभे राहणार का", सयाजी शिंदेंना निवडणुकीबद्दल प्रश्न; अजित पवारांनी दिलं भारी उत्तर
16
७६०० कोटींच्या ड्रग्ज प्रकरणी ईडीची कारवाई, दिल्ली-मुंबईत छापेमारी, गुन्हा दाखल
17
"...म्हणून मी मंत्रिमंडळ बैठकीतून तडकाफडकी निघालो?", अजित पवार यांनी केलं स्पष्ट 
18
भारतीय जवानांचा जीव धोक्यात, इस्रायलच्या 'या' निर्णयावर भारताने व्यक्त केली चिंता; जाणून घ्या काय आहे धोका
19
सैनी सरकारचा १५ ऑक्टोबरला शपथविधी, PM मोदींसह भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार!
20
नोएडातील एमिटी युनिव्हर्सिटी परिसरात दोन गटांमध्ये गोळीबार, एक विद्यार्थी जखमी

Viral Video: एक चूक अन्...,खिडकी साफ करण्यासाठी महिलेने स्वतःचा जीव घातला धोक्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2022 5:28 PM

इमारतीच्या चौथ्या मजल्यावर राहणाऱ्या महिलेने खिडकी साफ करण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घातल्याचे व्हिडिओत दिसत आहे.

गाझियाबाद: आपले घर, आसपासचा परिसर स्वच्छ ठेवणे महत्वाचे आहे. पण, ही स्वच्छता करताना स्वतःचा जीव धोक्यात घालणे कितपत योग्य? काहीजण अनेकदा घर स्वच्छ ठेवण्यासाठी धोकादायक पद्धतीचा अवलंब करतात. याची प्रचिती देणारा एक व्हिडीओ समोर आला आहे. एक महिला घराची खिडकी साफ करण्यासाठी स्वत:च्या जीवाची बाजी लावते. या महिलेचा कारनामा पाहून तुम्हीही चक्रावून जाल.

ही धक्कादायक घटना उत्तर प्रदेशमधील गाझियाबादमधून समोर आली आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक महिला खिडकीच्या बाहेर उभी राहून काच पुसत आहे. धक्कादायक बाब म्हणजे ही महिला चक्क चौथ्या मजल्यावरील खिडकीच्या बाहेर उभी आहे. खिडकी साफ करताना एक चूक झाली, तर त्या महिलेचा जीव जाऊ शकतो. पण, स्वतःच्या जीवाची पर्वा न करता ही महिला काच पुसत बसते.

व्हिडिओ पाहा:

मिळालेल्या माहतीनुसार, गाजियाबादच्या इंदिरापूरम येथील शिप्रा रिवेरा सोसायटीतील हा व्हिडिओ आहे. ही घटना रविवारची असल्याचे सांगितले जात आहे. ही महिला खिडकीची काच साफ करत असताना समोरच्या इमारतीमधील एक व्यक्ती हा संपूर्ण प्रकार आपल्या मोबाईलमध्ये कैद करतो. माधूरी सेंगर नावाच्या युझरने हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटीझन त्या महिलेच्या मुर्खपणावर विविध प्रतिक्रिया देत आहेत.

 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलUttar Pradeshउत्तर प्रदेश