Ghode par Sawar Dance by Ladakh girls, Viral Video: सोशल मीडियावर अनेकदा काही मनोरंजक व्हिडिओ चाहत्यांचे लक्ष वेधून घेण्यात यशस्वी होतात. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये लडाखमधील सौंदर्यवती बर्फाळ प्रदेशात दोन महिलांनी आपल्या नृत्याने सर्वांची मने जिंकली आहेत. लडाखमधील बर्फाच्छादित पर्वतांच्या मधोमध दोन महिलांनी 'घोडे पर सवार' या गाण्यावर पारंपारिक शैलीत नृत्य करून सर्वांना प्रभावित केले आहे.
काला या नेटफ्लिक्सच्या चित्रपटातील हे गाणं असून हे गाणं खूपच लोकप्रिय झालं आहे. या गाण्यावर दोन तरूणी सुंदर डान्स करताना दिसत आहेत. डान्स करताना दोघांची जुगलबंदी पाहून तुम्हीही त्यांचे कौतुक केल्याशिवाय राहणार नाही. एकीकडे जम्मू-काश्मीरमध्ये हिमवादळामुळे लोकांचे जगणे कठीण झाल्याच्या बातम्या येत आहेत. मात्र या कठीण परिस्थितीतही या दोन महिलांनी आपल्या नृत्याद्वारे सर्वांना संदेश दिला आहे, 'वेळ कशीही येवो, आनंदाचे काही क्षण मिळू शकतात. सकारात्मक राहा!'
ट्विटरवर जिग्मत लडाखी यांनी हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. दोन महिलांची ओळख पुंटसोक वांगमो आणि पद्मा लामो अशी त्यांनी करून दिली आहे. त्यांनी लिहिले की, लडाखमधील 'घोडे पे सवार' या गाण्यावर या दोन महिलांनी किती सुंदर नृत्य केले आहे. व्हिडीओच्या सुरुवातीला डोंगरांदरम्यानच्या रस्त्यावर महिला पारंपरिक पोशाख परिधान करताना दिसत आहेत. काही क्षणातच ते गाण्यावर नाचू लागतात आणि त्यांच्या डान्स स्टेप्सने साऱ्यांचीच मने जिंकतात.
शेअर केल्यापासून हा व्हिडिओ ९० हजारांपेक्षा जास्त वेळा पाहिला गेला आहे. या ट्विटला ४ हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. या व्हिडीओवर लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
'घोडे पे सवार' गाण्याबद्दल...
नेटफ्लिक्स चित्रपट काला चित्रपटामधील घोडे पे सवार हे गाणे अमिताभ भट्टाचार्य यांनी लिहिले असून अमित त्रिवेदी यांनी संगीतबद्ध केले आहे. सिरिशा भागवतुलाने सुंदरपणे गायलेले हे गाणे रिलीज झाल्यापासून चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहे.