हत्ती हा बुद्धीवंत प्राणी आहे. त्याची ताकद राजे रजवाड्यांपासून ते लाकूडतोड्यांपर्यंत सर्वांना माहिती होती. आता हे हत्ती एकतर जंगलात, राणीच्या बागेत किंवा संस्थानांकडे दिसतात. पण सर्वाधिक मौजमजा करतात ते जंगलातील हत्तीच. त्यांचे मन, त्यांचे आयुष्य हवे तिकडे फिरा, हवे ते खा... राग आला तर झाडांवर झाडे पाडा... परवा तुम्ही हत्तीचा जंगलातील सफरीसाठी आलेल्या लोकांचा पाठलाग केल्याचा व्हिडीओ पाहिला असेल. आता त्यापेक्षा भन्नाट व्हिडीओ आला आहे. त्याने केलेल्या जुगाडाचा.
हत्तीला राग येतो तेव्हा तो कशालाही टक्कर देऊ शकतो, परंतू तो जेव्हा शांत असतो तेव्हा तो आठ फुटी दरवाजातून देखील बाहेर पडू शकतो. काय वाचलात, घराच्या दरवाजातून हत्ती बाहेर पडला? कसे शक्य आहे. भारतीय वनाधिकाऱ्याने एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हि़डीओमध्ये हत्ती घरातून बाहेर पडताना दिसत आहे. तुम्हीही हा व्हिडीओ पाहू शकता...
हा व्हिडीओ आयएफएस अधिकारी सुशांता नंदा यांनी शेअर केला आहे. त्यांनी कॅप्शनमध्ये म्हटलेय की, गजराज यथेच्छ नाश्ता करून घरातून बाहेर पडताना... हा हत्ती घरात कसा घुसला? हत्ती आणि श्वानांना एक वरदान आहे, ते म्हणजे खूप दूरवरून ते गंध ओळखू शकतात. ही घटना कुठली आहे, कधीची आहे हे त्यांनी सांगितलेले नाही. परंतू, हा व्हिडीओ नेटवर खूप व्हायरल होत आहे. आतापर्यंत हा व्हिडीओ ११ हजार जणांनी पाहिला आहे.
ही क्लिप अवघ्या 27 सेकंदांची आहे, ज्यामध्ये एक मोठा हत्ती घराच्या छोट्या दरवाजातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करताना दिसतो. आतमध्ये जाताना तो असाच गेला असेल. अनेकांनी हत्तीच्या तंत्राला 'निंजा टेक्निक' असे म्हटले आहे.