Girl Dance in Metro Video: सोशल मीडियाच्या या युगात सर्वांनाच लोकप्रिय व्हायचं आहे. त्यामुळे व्हिडीओ कंटेट क्रिएटर्स आणि सोशल मीडिया युजर्स नवनवीन युक्त्या वापरताना दिसतात. इन्स्टाग्राम रील आणि फेसबुकच्या माध्यमातून विविध प्रकारचे व्हिडिओ पोस्ट केले जातात. आता एक नवीन व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक मुलगी मेट्रोमध्ये नाचताना दिसत आहे. हा व्हिडिओ ५० हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला असून शेकडो युजर्सनी त्यावर कमेंट केल्या आहेत. पण हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर एका वेगळ्याच वादाला सुरुवात झाल्याचेही चित्र आहे.
व्हायरल झालेला व्हिडीओ हैदराबाद मेट्रोचा असल्याचे सांगितले जात आहे. 'हाये हैदराबाद' नावाच्या ट्विटर हँडलने हा व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये एक मुलगी एका म्युझिक पीसवर नाचताना दिसत आहे. हे पूर्वा सुंदरनिकीचे प्रोमो गाणे आहे. हा व्हिडीओ पोस्ट करून कॅप्शन देण्यात आले आहे की, 'हैदराबाद मेट्रोमध्ये डान्स, हे कधी झालं?' सोशल मीडियावर या व्हिडीओची चांगलीच चर्चा झाली असून लोकांच्या प्रतिक्रियाही येत आहेत. पाहा व्हिडीओ-
मेट्रोमधील डान्सच्या या व्हिडीओचे काही लोक कौतुक करत आहेत आणि ही मुलगी बिनधास्त डान्स करत आहे. पण काही युजर्सला मात्र हा प्रकार रूचला नाही. 'सार्वजनिक वाहतुकीच्या वाहनांमध्ये असं करणं बरोबर नाही, ही कृत्य करणं नियमांचे उल्लंघन आहे, अशा मुलींवर कारवाई झालीच पाहिजे', असं काही युजर्सने कमेंट केलं. हा वाद जरी सध्या सुरू असला तरी त्या मुलीचा डान्स चांगलाच व्हायरल झाला आहे.