लॉकडाऊनमध्ये अनेकांना आपापल्या घरी राहून नवीन काही शिकण्याचा प्रयत्न केला. अनेकांनी लॉकडाऊनच्या या मोकळ्या वेळाचा फायदा घेत अनेक नवीन विक्रम केले. घरोघरच्या मुली लॉकडाऊनमध्ये युट्यूबवर पाहून आपल्याला हव्यात तश्या रेसीपीज् ट्राय करत होत्या. सर्वाधिक मुलींनी केक्सच्या सोप्या रेसीपी ट्राय केल्या होत्या. अशाच एका मुलीबाबत आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. तामिळनाडूमधील एका मुलीने ५८ मिनिटांमध्ये ४६ पदार्थ तयार करुन विश्वविक्रम केला आहे. या मुलीच्या विक्रमाची नोंद युनीको ई बूक ऑफ वर्ल्ड डेटामध्ये करण्यात आली आहे.
चेन्नईची रहिवासी असलेल्या या मुलीचे नाव एस. एन. लक्ष्मी साई श्री असं आहे. आईकडून जेवण बनवायला शिकलेल्या लक्ष्मीला हळूहळू स्वयंपाक करण्याची आवड निर्माण झाली. लक्ष्मीने हा विक्रम आपल्या नावावर केल्यानंतर, "मला खूप आनंद झाला आहे की हे मी करु शकले," असं लक्ष्मीने माध्यमांशी बोलताना सांगितले.
वृत्तसंस्था एएनआयने लक्ष्मी साई श्रीने तयार केलेल्या पदार्थांचे फोटोही शेअर केले आहेत. लक्ष्मीची आई एन. एलीमगल यांनी लक्ष्मी लॉकडाउनच्या काळात स्वयंपाक करायला शिकली, असं म्हटलं आहे. अगदी कमी कालावधीमध्ये लक्ष्मी चविष्ट पदार्थ बनवू लागली. त्याचवेळी लक्ष्मीच्या वडिलांनी तिला विश्विक्रम बनवण्याचा सल्ला दिला.
अरेरे! आईनं सोडलं, वडील तुरूंगात; ९ वर्षाच्या चिमुरड्यावर आली रस्त्यावर राहण्याची वेळ
लक्ष्मीच्या आईने सांगितले की, . "तामिळनाडूमधील वेगवेगळे पारंपारिक पदार्थ बनवायला मला आवडतं. लॉकडाउनच्या काळात माझी मुलगी माझ्यासोबत किचनमध्ये मला मदत करायची. जेव्हा मी लक्ष्मीला स्वयंपाकात असणाऱ्या आवडीबद्दल माझ्या पतीशी चर्चा केली तेव्हा त्यांनी आपण लक्ष्मीला स्वयंपाकासंदर्भातील विश्वविक्रम करण्यासंदर्भातील प्रयत्न करण्यासाठी सांगितले पाहिजे. असा सल्ला दिला.''
वाह, नादच खुळा! नवविवाहीत बहिणीला माहेरी आणायला भाऊ थेट हेलिकॉप्टर घेऊन पोहोचला
लक्ष्मीच्या वडिलांनी स्वयंपाकासंदर्भातील विश्वविक्रमाबद्दलची माहिती गोळा करण्यास सुरुवात केली. त्यावेळी त्यांना केरळमधील सावनी नावाच्या एका १० वर्षीय मुलीने ३० पदार्थ बनवण्याचे संदर्भ सापडले. त्यानंतर त्यांनी लक्ष्मीला हा विक्रम मोडण्यासाठी प्रोत्साहन दिलं आणि लक्ष्मीने हा विक्रम मोडीत काढत ५८ मिनिटांमध्ये ४६ पदार्थ बनवून पालकांचं नाव मोठं केलं आहे.