भारतात कोरोनाव्हायरसची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. बर्याच दिवसांपासून दररोज अधिकाधिक प्रकरणे नोंदविली जात आहेत. हे टाळण्यासाठी लोक लसीकरण करीत आहेत. ४५ पेक्षा अधिक वयाच्या लोकांनंतर आता १८ पेक्षा अधिक वय असलेले लोक लस घेत आहेत. दरम्यान, ज्यांना इंजेक्शनची भीती वाटते आहे त्यांचे व्हिडिओही समोर येत आहेत. लस घेताना एका मुलीने इतकी नाटकं केली आहेत. (Girl Scared And Crying During COVID Vaccination) तिच्या ओव्हर एक्टिंगमुळे अगदी डॉक्टरांनाही राग आला.
ती मुलगी लस घ्यायच्या आधीपासूनच वारंवार मम्मी, मम्मी ओरडत होती आणि पळून जाण्याचा प्रयत्न करत होती.आता हा व्हिडिओ (Viral Video) सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओत एक मुलगी खुर्चीवर बसलेली दिसते.
बापरे! किचनचा तुटलेला पाईप जोडण्यासाठी प्लंबरनं मागितले ४ लाख; व्हायरल होतोय पावतीचा फोटो
हातात इंजेक्शन घेऊन डॉक्टर जवळ येताच, घाबरून मुलगी डॉक्टरांना एक मिनिट थांबायला सांगते. नर्सनं या मुलीला पकडल्यानंतर ती मम्मी- मम्मी असं ओरडू लागते. आधीच लसीकरणासाठी खूपच रांग असते. त्यात या मुलीची नाटकं पाहून डॉक्टरांना राग अनावर झाला असावा.
नशीब चमकलं ना राव! पहिल्यांदाच तिकीट विकत घेतलं; १०० रूपयांच्या लॉटरीनं मजूराला करोडपती बनवलं
लस टोचल्या टोचल्या डॉक्टर या मुलीला निघून जा असं म्हणतात. 3 मे रोजी लॉजिकल थिंकर नावाच्या वापरकर्त्याने ट्विटरवर शेअर केला असून आतापर्यंत दहा लाखांहून अधिक व्हिव्हज त्याला मिळाले आहेत. तसेच 7 हजाराहून अधिक लाईक्सही मिळाले आहेत. 3 हजाराहून अधिक री-ट्वीट झाले आहेत. कमेंट विभागात, लोकांनी गमतीदार अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत ...