Social Viral : तिरंदाजी फारच अवघड खेळ आहे. कारण यात इतर खेळांच्या तुलनेत अधिक लक्ष केंद्रीत करावं लागतं आणि निशाणा लावावा लागतो. मोठे मोठे तीरंदाज एका एका पॉइंटने मिस होतात. एक व्हिडीओ समोर आला आहे ज्यात एक तरूणीने ज्याप्रकारे उलटी होऊन बाण चालवला ते बघून सगळेजण हैराण झालेत.
व्हिडीओत बघू शकता की, तरूणीने आधी हॅंडस्टॅंड केलं म्हणजे ती हातांवर उभी राहिली. त्यानंतर तिने पायांनी बाण आणि धनुष्य धरला त्यानंतर कंबर वाकवली. त्यानंतर पायानेच तिने बाण निशाण्यावर मारला.
हा व्हिडीओ उद्योगपती हर्ष गोयनका यांनी शेअर केला आहे. २२ सेकंदाच्या या व्हिडीओला १ लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. या व्हिडीओवर लोक वेगवेगळ्या कमेंट्स करत आहेत. तर काहींनी टिकाही केली आहे. त्यांच्यामते एकीकडे आपण शस्त्रांची पूजा करतो आणि दुसरीकडे तरूणी पायाने ते चालवत आहे.
मात्र, जास्तीत जास्त लोकांनी या तरूणीच्या कलेचं, तिच्या मेहनतीचं आणि तिच्या डेडीकेशनचं कौतुकच केलं आहे. लोक हा व्हिडीओ भरभरून शेअर करत आहेत.