कोरोना आणि लॉकडाऊनमुळे विद्यार्थी शाळेपासून दुरावले, नोकरी करणारे घरी बसले, ऑफिसऐवजी वर्क फ्रॉम होम करु लागले. एकमेकांच्या भेटीगाठी बंद झाल्या. ऑनलाईन बैठका सुरु झाल्या. मात्र लॉकडाऊनमुळे प्रेमी युगलांची मोठी पंचाईत झाल्याचं दिसून आलं. प्रेयसीला भेटण्यासाठी प्रियकरांनी लढवलेली शक्कल तुम्ही बातम्यांमधून ऐकली असेल. लॉकडाऊन काळात प्रेमी युगलांना एकमेकांना भेटताही येत नव्हते.
सोशल मीडियात असे अनेक मीम्सही व्हायरल झाले. त्यामुळे प्रेमी जोडप्यांना व्हिडीओ कॉल हा एकमेव पर्याय उरला. बहुतांश कपल्स व्हिडीओ कॉलवरच रोमान्स सुरु करतात. परंतु सध्या इंग्लंडमधील एक महिला चर्चा भलतीच चर्चेत आली आहे. या महिलेला व्हिडीओ कॉलवरुन रोमान्स करणं इतकं महागात पडलं की, तिला थेट उपचारासाठी हॉस्पिटल गाठावं लागलं. सेंट्रल लंडनमध्ये राहणाऱ्या २१ वर्षीय रोजी सनशाइन(Rosiee Sunshine) ला व्हिडीओ कॉलवरुन रोमान्स करताना एका मोठ्या समस्येला तोंड द्यावं लागलं.
डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, महिला तिच्या दूर असलेल्या बॉयफ्रेंडसोबत व्हिडीओ कॉलवर बोलत होती. दोघंही व्हिडीओ कॉलवर खूप रोमॅन्टिक झाले. त्यानंतर हळूहळू हा रोमान्स वाढला तेव्हा रोजीनं आणखी उत्तेजित झाली आणि तिनं एडल्ट टॉयचा वापर केला. परंतु तीच महिलेची मोठी चूक ठरली. रिपोर्टनुसार, एडल्ट टॉयचा वापर करताना रोजीच्या शरीरात तो गेला. अनेक प्रयत्नानंतरही तिला ते बाहेर काढता आले नाही त्यामुळे तिला तिच्या सहकारी मैत्रिणीसोबत हॉस्पिटल गाठावं लागलं.
रोजीनं सांगितल्यानुसार, ही घटना तिच्यासाठी खूप लज्जास्पद होती. जेव्हा डॉक्टरांनी एक्स रे काढला तेव्हा जवळपास १० सेमी लांब आणि ४ मीटर रुंद सिलिकॉन टॉय पाहून त्यांना धक्काच बसला. डॉक्टरांनी विना सर्जरी करता रोजीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये अडकलेला टॉय शरीराच्या बाहेर काढला. मात्र या प्रकारामुळे तिला जखम झाली होती. महिलेने सांगितले की, जेव्हा तिने आणि तिच्या बॉयफ्रेंडनं हा प्रकार पाहिला तेव्हा दोघंही घाबरले. घरगुती उपाय करत टॉय बाहेर काढण्याचा प्रयत्न केला परंतु स्थिती आणखी बिघडली. मग मैत्रिणीला सोबत घेऊन तिला डॉक्टरांकडे जावं लागलं. डॉक्टर म्हणाले की, जर वेळीच हा टॉय काढला नसता तर महिलेच्या शरीरात गंभीर दुखापत होण्याची शक्यता होती.