Viral Video : रोज सोशल मीडियावर शेकडो व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेदार असतात तर काही व्हिडीओ बघून हैराण व्हायला होतं. जेव्हा लोक एखाद्या वाईट स्थितीत फसतात तेव्हा ते देशी जुगाड लावणं सुरू करतात. पण कधी कधी असे जुगाड करणंही महागात पडतं. नुकसान छोटं असेल तर काही नाही पण जास्त असेल तर डोकं खराब होतं. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. एका महिलेने फोर व्हिलर गाडीत बसून असाच जुगाड करण्याचा प्रयत्न केला. पण ती फसली.
या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, एक लक्झरी कार रस्त्याच्या किनारी उभी आहे. गाडीखाली खूपसारं पाणी जमा झालं आहे. गाडीत बसण्यासाठी महिलेने आयडियाची कल्पना केली. पण तिला नव्हतं माहीत की, तिच्यासोबत काय होणार आहे.
महिलेने गाडीत बसण्यासाठी कारचा मागचा दरवाजा उचलला आणि आपला एक पाय गाडीच्या आत ठेवला. दुसरा पाय जोर लावून खेचण्याचा प्रयत्न केला. महिला गाडीत तर बसली, पण तिच्या खिशातून तिचा महागडा मोबाईल पाण्यात पडला. मोबाइल तिने आधी हातांनी शोधण्याचा प्रयत्न केला. नंतर दोन्ही पायांनी मोबाइल शोधणं सुरू केलं.
हा व्हिडीओ पाहून लोकांचं डोकं चक्रावून गेलं आहे. या महिलेला नंतर नक्कीच जाणीव झाली असेल की, तिने जुगाड करण्याच्या नादात आपलंच नुकसान करून घेतलं. हा व्हिडीओ @haryana.zone नावाच्या इन्स्टा अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. लोक यावर अनेक मजेदार कमेंट्सही करत आहेत.