जेव्हा तुमच्यावर प्रेम करणारा व्यक्ती तुमच्या संपर्कात नाहीये किंवा तुमच्या फोन-मेसेजला उत्तरच देत नसेल तर तुम्ही काय कराल? जास्तीत जास्त प्रकरणांमध्ये लोक समोरच्या व्यक्तीचा फोन-मेसेज येण्याची वाट बघतात किंवा जास्तीत जास्त त्या व्यक्तीच्या घरी जाऊन भेटण्याचा प्रयत्न केला जातो. पण यातील कशाचाच फायदा होत नसेल तर काय करावं? याचं उत्तर मिळालं आहे.
झालं असं की, पॉलिना नावाच्या एका मुलीसोबत असंच काहीसं झालं आहे. पॉलिनाच्या बॉयफ्रेन्ड जॉर्जने तिच्याशी बोलणं केलं. त्यानंतर पॉलिनाने त्याच्याशी वेगवेगळ्या मार्गाने संपर्क करण्याचा प्रयत्न केला. पण त्याच्याशी बोलणं झालं नाही. दोघांनी एकेदिवशी एका पार्टीला सोबत जाण्याचं ठरवलं होतं. पण अचानक त्याच रात्रीपासून जॉर्जने पॉलिनाचे फोन रिसीव्ह करणंच बंद केलं. तसेच कोणत्याही मेसेजचा कोणताही रिप्लाय सुद्धा दिला नाही.
अशात पॉलिना चांगलीच घाबरली आणि तिच्या मनात वेगवेगळ्या शंका उपस्थित होऊ लागल्या होत्या. त्यामुळे पॉलिनाने बॉयफ्रेन्ड जॉर्जला शोधण्यासाठी एक आयडियाची कल्पना लावली. तिच्या या आयडियामुळे पॉलिनाला फायदाही झाला आणि जॉर्ज तिच्या या वेगळ्या आयडियावर खूशही झाला. इतकेच नाही तर पॉलिनाच्या या आयडियामुळे तिची सोशल मीडियात चर्चाही रंगली आहे.
कॅलिफोर्निया स्टेट यूनिव्हर्सिटीच्या २१ वर्षीय पॉलिनाने शांतपणे वेळ घेऊन एक व्हिडीओ तयार केला. हा मूवी ट्रेलर तयार करण्याचा उद्देश बॉयफ्रेन्डला शोधणं हा होता.
हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला. ट्विटरवर हा व्हिडीओ ५१ हजारपेक्षा जास्त वेळा रिट्विट केला गेला आणि १ लाख ६८ हजार पेक्षा जास्त याला लाइक्स मिळाले. पॉलिना म्हणाली की, जॉर्ज केवळ एक तासासाठी झोपला होता. पण मला कंटाळा आला होता आणि मग एक व्हिडीओ तयार करण्यासाठी बसले. जेणेकरुन तो हा व्हिडीओ पाहून चकीत होईल. ती म्हणाली की, तुमचा बॉयफ्रेन्डही अशाप्रकारे तुम्हाला रिप्लाय देत नसेल तर तुम्ही असा व्हिडीओ तयार करु शकता.
मला वाटतं की, लोकांना हा व्हिडीओ आवडला आहे. पण काही लोकांनी हा व्हिडीओ फारच गंभीरतेने घेतला. त्यांना असं वाटतं की, मी फार पझेसिव्ह आहे. पण मला त्यांना सांगायचंय की ही केवळ एक प्रकारची गंमत होती.