Girls Fight Viral Video: मुलींसाठी दोन मुलांमध्ये भांडण झालेले तुम्ही अनेकदा ऐकले असेल. पण, मुलीदेखील मुलांसाठी भांडण करतात. अशाप्रकारचे अनेक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झालेले आहेत. आता अशाच प्रकारचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल होतोय, ज्यात दोन मुलींचे जोरदार भांडण दिसत आहे. दोघींमधील भांडण इतके वाढले की, एका मुलीने दुसरीवर चक्क खुर्चीने मारहाण केली.
व्हिडीओच्या सुरुवातीला एक मुलगी खुर्ची उचलून दुसऱ्या मुलीवर फेकताना दिसत आहे. तर दुसरी मुलगी स्वत:ला वाचवण्यासाठी दूर पळून जाताना दिसत आहे. घर के कलेश नावाच्या अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला हे. 'यूपीच्या गोरखपूरमध्ये चहाच्या स्टॉलवर एका मुलावरुन दोन मुलींमध्ये भांडण झाले,' असे कॅप्शन व्हिडिओला दिले आहे.
हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. व्हिडिओवर कमेंट करताना एका यूजरने म्हटले की, 'मला थोडा राग आला.' आणखी एका यूजरने लिहिले की, 'गोरखपूर खूप बदलले आहे. दिल्ली, नोएडाप्रमाणेच मुली एकमेकांशी भांडत आहेत, तेही मुलासाठी.' तिसर्या यूजरने लिहिले की, 'जेव्हा या मुली एकमेकांशी भांडतात तेव्हा चांगल्या दिसत नाही.'