नवी दिल्ली - पैशाने सगळं सुख घेता येते? हा प्रश्न कायम अनुत्तरीतच राहिला आहे. सोशल मीडियावर २४ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअरची पोस्ट व्हायरल झाल्यानंतर यूझर्सने त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. युवकाला जवळपास महिन्याला ५ लाख रुपये पगार आहे तरीही उच्चशिक्षित असलेला हा तरूण एकटेपणाशी लढत आहे.
Grapevine App वरून ही पोस्ट व्हायरल झालीय, त्याचा स्क्रिनशॉट्स Sukhada नावाच्या ट्विटर यूझरने शेअर केला आहे. सध्या या पोस्टवर यूझर्स त्यांची मते मांडत आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय की, दूसरा भारत... सुखदा यांच्या ट्विटला ४ लाखाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. शेकडो लोकांनी त्याला रिट्विटही केले आहे.
४८ लाखांचे पॅकेज तरी एकटेपणा रडवतोयस्वत:ला सॉफ्टवेअर इंजिनिअर सांगणाऱ्या युवकाने पोस्टमध्ये लिहिलंय की, आयुष्यात सध्या वेगळ्या वळणावरून चाललोय, मी बंगळुरूतील FAANG कंपनीत २४ वर्षीय इंजिनिअर म्हणून काम करतोय. माझ्याकडे २.९ वर्षाचा अनुभव आहे. वर्षाकाठी ४८ लाखांचे पॅकेज आहे. एक चांगले जीवन जगण्यासाठी हे पुरेसे आहे. परंतु मी आयुष्यात त्रस्त आहे आणि एकटाच राहतो. माझ्याकडे वेळ घालवण्यासाठी कुणीही गर्लफ्रेंड नाही.
युवकाने पुढे म्हटलंय, माझे सर्व मित्र त्यांच्या आयुष्यात व्यस्त आहेत. इतकेच नाही तर माझी वर्क लाईफही बोरिंग चाललीय. कारण मी माझ्या करिअरच्या सुरुवातीपासून एकाच कंपनीत आहे. प्रत्येक दिवशी एकच काम करतो. आता नवीन आव्हानांचे आणि संधीची वाट पाहत नाही. माझ्या आयुष्याला सुखमय बनवण्यासाठी मी नेमकं काय करायला हवे याचा मला सल्ला द्या. जिमला जा, म्हणू नका, कारण मी आधीच जातोय असंही युवकाने विचारले आहे.
यूझर्स म्हणाले, संघर्षच जीवन आहेया पोस्टवर यूझर्सच्या अनेक कमेंट्स आल्या आहेत. एका यूझरने लिहिले की, जीवन संघर्ष आहे. एकटेपणा आधुनिक जीवनाचा श्राप आहे. धावपळीच्या या जगात आपण स्वत:साठी आणि आपल्या माणसांसाठी वेळ काढायला हवा. तर अन्य यूझरने पैसा खूप काही आहे, परंतु सर्वकाही नाही असं सांगितले. पैशाने समाधान मिळू शकते परंतु आनंद मिळवण्यासाठी सामाजिक, भावनिक नात्यांची गरज आहे. सध्या या पोस्टला दिड हजाराहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.