काल जालोर जिल्ह्यातील सांचोर उपविभागातील लछडी गावात एक चार वर्षांचा मुलगा नव्याने खोदलेल्या बोअरवेलमध्ये पडला. ९० फूट खोल खोदलेल्या बोअरवेलचे तोंड लोखंडाच्या वायरने झाकले होते. तिथेच मुलगा खेळत होता. या दरम्यान तो घसरुन आत पडला. माहिती मिळताच उच्च अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. गुजरातमधील एनडीआरएफ टीमला बोलविण्यात आले होते.
बचाव कार्या दरम्यान १६ तासांनंतर, बोअरवेलमध्ये अडकलेल्या चिमुरड्याला रात्री २: २४ वाजता सुरक्षित बाहेर काढण्यात आले. या मुलाला बाहेर काढण्यासाठी रहिवासी माधाराम सुथार यांनी स्वदेशी जुगाड करायला सुरूवात केली. जेव्हा निष्पाप मुलाला बाहेर काढलं तेव्हा कुटुंबियांना अश्रू अनावर झाले. तर संपूर्ण गावाला आनंद झाला.
काय आहे प्रकरण
हा मुलगा खाली पडल्यानंतर काहीतरी इशारे करत असल्याचं दिसून आलं पण काय बोलतोय हे कळलं नाही. त्यानंतर बोअरवेलमध्ये कॅमेरा टाकण्यात आला. दोरीच्या सहाय्याने पाण्याची बाटली पाठविली गेली, त्यानंतर मुलाने पाणी प्याले. खेदजनक गोष्ट म्हणजे ७ तासांनंतरही एनडीआरएफची टीम घटनास्थळी पोहोचू शकली नाही. गावकरी या चिमुरड्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होते.
अरे व्वा! टेक महिंद्रानं विकसित केलं कोरोनाचा खात्मा करणारं औषध; लवकरच पेटंट मिळणार
दैनिक भास्करनं दिलेल्या माहितीनुसार ही घटना लाछडी गावातल्या नागाराम देवासी यांच्या शेताची आहे. जिथे नवीन बोअरवेलचे उत्खनन करण्यात आले. वरून वायरने बोअरवेल झाकलेला होता. काल सकाळी दहाच्या सुमारास नागाराम यांचा चार वर्षाचा मुलगा अनिल आतून बोअरवेल पाहण्याचा प्रयत्न करू लागला. यावेळी संतुलन बिघडल्याने तो आत गेला. जवळच उभं असलेलं एक कुटुंब त्याला खाली पडताना पाहून मोठ्याने ओरडलं पण तोपर्यंत बराच उशीर झाला होता.
कोरोनाची सौम्य लक्षणं असल्यास चुकूनही करू नका CT-SCAN; एम्स संचालकांचा धोक्याचा इशारा
दैनिक भास्करनं दिलेल्या माहितीनुसार ही घटना लाछडी गावातल्या नागाराम देवासी यांच्या शेताची आहे. जिथे नवीन बोअरवेलचे उत्खनन करण्यात आले. वरून वायरने बोअरवेल झाकलेला होता. आज सकाळी दहाच्या सुमारास नागाराम यांचा चार वर्षाचा मुलगा अनिल आतून बोअरवेल पाहण्याचा प्रयत्न करू लागला. यावेळी संतुलन बिघडल्याने तो आत गेला. जवळच उभं असलेलं एक कुटुंब त्याला खाली पडताना पाहून मोठ्याने ओरडलं पण तोपर्यंत बराच उशीर झाला होता.