जर तुम्ही विचार करत असाल की, सेल्फी घेण्याची आवड केवळ मनुष्यांनाच आहे तर तुम्ही चुकताय. कारण इंटरनेटवर गोरिलांच्या सेल्फी सध्या चांगलाच धुमाकूळ घातला आहे. हा सेल्फी कांगोच्या एका नॅशनल पार्कमध्ये काढण्यात आला. हा सेल्फी पाहून तुम्हीही म्हणाल की, गोरिला हे सेल्फी घेण्यात मनुष्यांपेक्षाही माहीर आहेत.
या सेल्फीमध्ये तुम्ही अॅंटी-पोचिंगच्या अधिकाऱ्यांसह दोन गोरिला बघू शकता. यातील एकाचं नाव Ndakasi आणि दुसऱ्याचं नाव Matabishi आहे. सेल्फीसाठी दोघांची उभं राहण्याची स्टाइल सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. त्यामुळेच गोरिलांचा सेल्फी सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.
हा सेल्फी अॅंटी-पोचिंग ग्रुपने The Elite AntiPoaching Units And Combat Tracker नावाच्या फेसबुक पेजवर शेअर केला आहे. हा सेल्फी विरुंगा नॅशनल पार्कमध्ये घेतला गेल्याचं बोललं जात आहे.
रिपोर्ट्सनुसार, विरुंगा आफ्रिकेतील सर्वात जुन्या नॅशनल पार्कपैकी एक आहे. जे वर्ल्ड हेरिटेज सुद्धा आहे. या पार्कमध्ये जगातले एक तृतियांश गोरिला आहेत. त्यांच्या सुरक्षेसाठी ६०० रेंजर्स ठेवण्यात आले आहेत.