शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
3
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
4
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
5
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
6
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
7
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
8
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
9
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
10
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
11
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
12
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
13
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
14
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
15
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
16
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
17
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
18
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
19
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?

संतापजनक! सरकारी शाळेतील मुलांना लावलं जातयं झाडू अन् भांडी घासायचं काम; व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2021 6:32 PM

Trending Viral News in Marathi : या फोटोंमध्ये तुम्ही पाहू शकता सरकारी शाळेतील मुलांना झाडू मारायला लावलं जात आहे. तर काही मुलं भांडी घासताना दिसून येत आहेत.

सरकारी शाळेतील अवस्था याबाबत काही वेगळं सांगायला नको. तरिही अनेक राज्यांमध्ये शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्न केले  जात आहेत. दरम्यान उत्तरप्रदेशातील हापूड येथिल एक संतापजनक घटना व्हायरल होत आहे. हे व्हायरल फोटो पाहून तुम्हालाही संताप अनावर होईल. या फोटोंमध्ये तुम्ही पाहू शकता सरकारी शाळेतील मुलांना झाडू मारायला लावलं जात आहे. तर काही मुलं भांडी घासताना दिसून येत आहेत. हा व्हिडीओ जनपद हापूडच्या शाळेमधील असल्याचं सांगितलं जात आहे. 

योगी सरकार सरकारी शाळेतील स्थिती सुधारण्यासाठी अनेक प्रयत्न करताना दिसून येत आहे. पण शिक्षण विभागातील काही लोकांकडून या  प्रयत्नाांवर पाणी फिरवलं जात आहे.  समोर आलेल्या माहितीनुसार काही शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारायला सांगितला जात आहे. इतकंच नाही तर वर्गाच्या बाहेर भांडी घासायला सुद्धा पाठवलं जात आहे.  

बापरे! वेळेच्या २ मिनिटं आधीच ऑफिस सोडलं म्हणून सरकारी कामगाराचा कापला पगार अन्.

व्हायरल झालेल्या या फोटोंमुळे गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता एक छोटीशी विद्यार्थिनी हातात झाडू घेऊन  वर्गात झाडू मारत आहे. तर दोन मुलं वर्गाच्या बाहेर  ताट, तांब्या अशी  ४-५ भांडी धूत आहेत. या मुलांचे वय सहा ते आठ वर्षादरम्यान असल्याचं सांगितलं जात आहे. जेव्हा मुलांना या कामाबाबत विचारणा करण्यात आली तेव्हा त्यांनी शिक्षकांनी काम सांगितल्याची माहिती देत अंजू मॅडम यांचे नाव  घेतलं.  

'ही' तरूणी आहे लेडी 'गजनी', गर्लफ्रेन्ड आणि परिवाराचीही तिला राहत नाही आठवण!

फोटो व्हायरल झाल्यानंतर या मुलांचे आई वडील संतापले असून आता शिक्षकांना धारेवर धरलं जात आहे. या प्रकरणाबाबत शिक्षण अधिकारी अर्चना गुप्ता यांनी या प्रकरणाचा पूर्ण तपास करून दोषींवर कारवाई केली जाईल असं म्हटलं आहे. आता शिक्षण विभागाकडून कोणतं पाऊल उचललं जातं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSocial Viralसोशल व्हायरलUttar Pradeshउत्तर प्रदेशSchoolशाळाStudentविद्यार्थी