Anaconda Viral Video: ॲनाकोंडा (anaconda) हा अॅमेझॉनच्या जंगलातील सर्वात रहस्यमय आणि शक्तिशाली प्राणी आहे. अॅनाकोंडा जगातील सर्वात मोठा साप असून, या प्राण्यावर गेल्या अनेक वर्षांपासून अभ्यास सुरू आहेत. फार पूर्वी पृथ्वीवर महाकाय आकाराचे अॅनाकोंडा राहायचे, पण कालांतराने ते नामशेष झाले. पण, आता पृथ्वीवरील सर्वात मोठा अॅनाकोंडा सापड सापडला आहे.
ट्विटरवर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात दावा केला जातोय की, शास्त्रज्ञांना जगातील सर्वात मोठा आणि लांब अॅनाकोंडा साप सापडला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा नॉर्दर्न ग्रीन ॲनाकोंडा (green anaconda) आहे. ज्या शास्त्रज्ञाने याचा शोध लावला, त्याचा व्हिडिओ ट्विटरवर ट्रेंडिंगमध्ये आहे. या सापाची लांबी सुमारे 26 फूट आणि वजन 250 किलोपेक्षा जास्त आहे.
व्हिडिओमधील ॲनाकोंडा नदीमध्ये अतिशय स्लो दिसत असला तरी, जमिनीवर अतिशय चपळ असतो. हे साप प्रामुख्याने अॅमेझॉन आणि ओरिनोको खोऱ्यात आढळतात. नॉर्दर्न ग्रीन ॲनाकोंडा इक्वेडोर, कोलंबिया, व्हेनेझुएला, त्रिनिदाद, गिनी, सुरीनाम आणि फ्रेंच गयाना येथे अनेकदा दिसून आला आहे. कॅपीबारा, मगर, हरिण, लहान गाय यांसारखे प्राणी ते जिवंत गिळू शकतात.