कोरोनाकाळात लग्न कार्य तसंच इतर कार्यक्रमांसाठी शासनाकडून गाईडलाइन्स देण्यात आल्या आहेत. अनेक ठिकाणी नियमांचे पालन करून शिस्तबद्ध रितीनं लग्नकार्य पार पडत आहेत. तर कुठे कोरोनाच्या नियमांना धाब्यावर बसवून मानमानी कारभार सुरू आहे. अशीच एक घटना सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
गुजरातच्या राजकोटमधील एक तरूण आपल्या कुटुंबातील लोकांसह लग्नासाठी जात असताना कोरोनाच्या गाईडलाईन्सचे पालन केलेलं दिसून आलं नाही. पोलिसांनी हा प्रकार पाहताच या मुलाला आणि त्याच्या नातेवाईकांना पोलिस स्थानकात घेऊन गेले.
बापरे! किचनचा तुटलेला पाईप जोडण्यासाठी प्लंबरनं मागितले ४ लाख; व्हायरल होतोय पावतीचा फोटो
टाईम्स ऑफ इंडियानं दिलेल्या माहितीनुसार पोलिसांना या गोष्टींची सुचना मिळाली होती की, लग्नाच्या ठिकाणी खूप गर्दी जमा झाली आहे. त्यानंतर घटनास्थळी पोहोचून पोलिसांना मुलाला आणि त्याच्या नातेवाईकांना ताब्यात घेतलं. डिसीपी प्रदिपसिंग जाडेजा यांनी दिलेल्या माहितीनुसार या लग्नात जवळपास २०० लोक उपस्थित होते.
'चल आता निघ इथून', लस घेताना पोरीची नाटकं पाहून भडकले डॉक्टर; पाहा व्हायरल व्हिडीओ
याशिवाय मास्कसुद्धा लावले नव्हते. सध्या फक्त ५० लोकांना लग्नाला उपस्थित राहण्याची परवागनी असताना या मंडळींना २०० लोकांना बोलावले, म्हणून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. पोलिसांनी फोटोग्राफर, नवरीचे वडील, भाऊ, पंडीत, आचारी या सगळ्यांना अटक केली. चार तासांनंतर त्यांना बेलवर सोडवण्यात आलं. त्यानंतर अनिलचा विवाह पार पडला.