लग्नाच्या वरातीत अनेकदा नातेवाईक रागावल्याचे किस्से ऐकले असतील. लग्नात कोणत्या ना कोणत्या कारणाने पाहुणे मंडळी रागावतात आणि कधी कधी संपूर्ण लग्नाचे वातावरण बिघडवतात. राग येण्याचे कारण अगदी किरकोळ असले तरी वाद होतातच. यामुळे, बहुतेक लोक त्यांच्या लग्नात काही खास नातेवाईकांची विशेष काळजी घेण्याचा प्रयत्न करतात, जेणेकरून त्यांना तक्रार करण्याची संधी मिळू नये.
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये लग्नादरम्यान मोठा गोंधळ झाला आहे. कारण असे आहे की जे ऐकून तुम्हाला हसू येईल. सध्या व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ यूपीमधील बागपतचा आहे. या व्हिडिओमध्ये लोक अत्यंत वाईट पद्धतीने भांडताना दिसत आहेत. जेवणावरून वाद झाला आणि दोन्हीकडची मंडळी आपापसात भिडल्याची घटना समोर आली आहे.
लग्नादरम्यान मुलीच्या घरच्यांनी जेवणात मटार-पनीर न दिल्याने नवरदेवाच्या काकाला राग आला होता आणि या कारणावरून लग्नात गोंधळ झाला. हे भांडण एक-दोन लोकांमध्ये नाही तर तिथे उपस्थित असलेल्या सर्व लोकांमध्ये झाले. आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
व्हिडीओ शेअर करताना युजरने लिहिले की, "लग्नामध्ये काकांना मटार-पनीर न दिल्याचे काय परिणाम होतात ते पाहा." उत्तर प्रदेशातील बागपतचे हे प्रकरण आहे. हा गोंधळ थांबवण्यासाठी पोलिसांना बोलवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. दोन्ही बाजूंच्या अनेकांना ताब्यातही घेण्यात आले असून अधिक तपास सुरू आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"