(Image credit- India today)
कोरोनाच्या प्रसारामुळे गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून संपूर्ण जगाचे चित्र पालटल्याप्रमाणे वाटत आहे. कोरोनाचा वाढता प्रसार थांबवण्यासाठी अनेक ठिकाणी लॉकडाऊन करण्यात आला. आजपर्यंत कधीही न थांबलेली मुंबई कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे पूर्णपणे थांबली. या कालावधीत निसर्गाचे आणि प्राण्यांचे नवं रूपआणि वेगळेपण पाहायला मिळाले. ऐरवी माणसांची गर्दी असलेल्या रस्त्यांवर प्राण्यांचा मुक्त संचार पाहायला मिळाला. विविध प्राणी, पक्ष्यांची मोकळ्या रस्त्यांवर यायला सुरूवात झाली. सध्या सोशल मीडियावर एक हरणांचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
तुम्हाला वाटेल हा व्हिडीओ कुठल्या जंगलातील आहे. पण हा हरणांचा व्हायरल होणारा व्हिडीओ मुंबईतील आहे. मुंबईच्या मिठी नदीच्या किनारी हरीण धावताना दिसून येत आहेत. या व्हिडीओ वकिल आणि पर्यावरणप्रेमी अफरोज शाह यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. लॉकडाऊनचा सकारात्मक परिणाम दिसत असल्याचे कॅप्शन दिले आहे. व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये मिठी नदी किनारी हरणांचा कळप मुक्त संचार करताना दिसत आहे.
हा व्हिडीओ २ जुलैला शेअर करण्यात आला आहे. संध्याकाळच्या वेळी मिठी नदीच्या किनारी हरणांचा संचार कॅमेरात कैद झाला आहे. ३०० पेक्षा जास्त लाईक्स आणि १३९ पेक्षा जास्त रिट्वीट्स या व्हिडीओला मिळाले आहेत. या व्हिडीओवर अनेक कमेंट्स येत आहेत. लोक हा व्हिडीओ पाहून खूप आनंद घेत आहेत.
या युजरने कमेंट केली आहे की, या व्हिडीओने मला आनंद दिला आहे. तसंच हा व्हिडीओ पाहून लॉकडाऊनबाबत माझं मत सकारात्मक झाले आहे. याआधीसुद्धा असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यात मुंबईच्या रस्त्यांवर मोर फिरताना दिसून आले होते. मुंबईच्या रस्त्यांवर मोराचे सौंदर्य पाहायला मिळाले होते.
'या' मंदिरात होते Royal Enfield Bullet ची पुजा; मंदिराची कहाणी वाचाल तर अवाक् व्हाल
हत्तीच्या पिल्लाचा 'हा' व्हिडीओ पाहून नेटकरी संतापले; असं काय झालंय?, पाहा व्हायरल व्हिडीओ