Gujarat Election Result 2022 Live Trending Video: गुजरात निवडणुकीच्या निकालात भारतीय जनता पार्टी (BJP) प्रचंड बहुमताने सरकार स्थापन करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. अनेक ठिकाणी विजयी होत कलांमध्ये भाजपाने १८२ पैकी १५० जागांचा टप्पा पार केल्याचे दिसतंय. अशा परिस्थितीत सोशल मीडियावर अनेक मीम्स शेअर होत आहेत. यामध्ये एक अतिशय मजेदार क्लिप देखील सध्या व्हायरल होत आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही क्लिप खूपच मजेशीर पद्धतीने एडिट केली आहे. या क्लिपमधून गुजरातमधील निकाल लोकांना अतिशय सहज आणि धमाल पद्धतीने समजावून सांगण्यात आला आहे.
ही क्लिप पाहून तुम्हाला कळेल की गुजरातमध्ये भाजपा, काँग्रेस आणि आम आदमी पार्टीची (आप) नक्की काय अवस्था झाली आहे. हिमाचल प्रदेशमध्ये सत्ताधारी भाजप आणि काँग्रेसमध्ये मतसंख्येच्या बाबतीत निकराची लढत आहे. पण गुजरातमध्ये मात्र एकहाती सत्ता भाजपानेच राखली आहे. इतकेच नव्हे तर विक्रमी विजय भाजपाच्या नावावर नोंदवला जात आहे. याच पार्श्वभूमीवर पाहा तो व्हायरल होणारा व्हिडीओ-
दरम्यान, ही व्हिडिओ क्लिप @iPandeyShweta ट्विटर हँडलवर हसणाऱ्या इमोजीसह "गुजरात निवडणुकीचे निकाल समजून घ्या" या कॅप्शनने शेअर करण्यात आली आहे. या क्लिपला ८० हजारांहून अधिक व्ह्यूज आणि सुमारे अडीच हजारांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत. तसेच शेकडो युजर्सनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. क्लिप पाहिल्यानंतर अनेक युजर्स हसून लोटपोट होत असल्याचेही कमेंटमध्ये दिसतंय. काहींनी तर असेही लिहिले आहे की गुजरात निवडणुकीच्या निकालाचे हे सर्वोत्तम स्पष्टीकरण आहे. वास्तविक, ही क्लिप अभिनेता सलमान खान आणि आमिर खान यांच्या ‘अंदाज-अपना-अपना’ या प्रसिद्ध चित्रपटातील आहे. गुजरात निवडणुकीच्या निकालांना लक्षात घेऊन ती एडिट करण्यात आली आहे. परेश रावल यांच्याजागी PM मोदींचा चेहरा लावण्यात आला आहे.