नवी दिल्ली ।
तुम्ही आतापर्यंत A, B, O आणि AB अशा नावांचे रक्तगट (Blood Group) ऐकले असतील. मात्र एका दुर्मिळ रक्तगटाची व्यक्ती भारतात आढळली आहे. विशेष म्हणजे जगभरात अशा रक्तगटाच्या मोजक्या १० व्यक्ती असून या घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे. ही भारतातील पहिलीच व्यक्ती आहे, ज्याचा एक दुर्मिळ रक्तगट आढळला आहे. या दुर्मिळ रक्तगटाचे नाव ईएमएम निगेटीव्ह (FMM Negative) असे आहे. या रक्तगटाची देशात पहिलीच व्यक्ती सापडल्याने डॉक्टर्संना देखील धक्का बसला आहे.
गुजरात मधील राजकोटमध्ये राहणाऱ्या ६५ वर्षीय व्यक्तीचा हा दुर्मिळ रक्तगट आढळला आहे. ही व्यक्ती हृदयाच्या आजाराने ग्रस्त आहे, जेव्हा त्याच्या रक्ताची चाचणी केली तेव्हा काही धक्कादायक माहिती समोर आली आणि हा रक्तगट असल्याचे उघड झाले. लक्षणीय बाब म्हणजे यापूर्वी जगातील फक्त ९ लोक असे होते ज्यांचा ईएमएम निगेटीव्ह रक्तगट आढळला होता. एका व्यक्तीच्या शरीरामध्ये विविध प्रकारच्या रक्त प्रणाली असतात. कोणामध्ये ए, कोणामध्ये बी, कोणामध्ये ओ, तर एखाद्या व्यक्तीमध्ये आरएच आणि काही व्यक्तींमध्ये डफी हे सर्व सामान्य रक्तगट असतात.
व्यक्तीच्या शरीरात रक्ताची कमीदरम्यान, EMM निगेटिव्ह आढळणाऱ्या लोकांमध्ये ४२ प्रकारच्या रक्त प्रणाली असतात. या रक्तगटातील लोकांमध्ये हाय-फ्रिक्वेंसी ॲंटिजनची भरपूर प्रमाणात कमतरता असते. अशी लोक कोणाचेच रक्त घेऊ शकत नाहीत आणि कोणाला आपले रक्त दानही करू शकत नाहीत. गुजरातमधील ज्या ६५ वर्षीय व्यक्तीमध्ये हा रक्तगट आढळला आहे त्या व्यक्तीला रक्ताची नितांत गरज आहे. कारण त्याच्या हृदयाची शस्त्रक्रिया करायची आहे, मात्र रक्ताच्या कमतरतेमुळे त्याच्या हृदयाच्या शस्त्रक्रियेस अढथळा निर्माण झाला आहे. इंटरनॅशनल सोसायटी ऑफ ब्लड ट्रांसफ्यूजनने या रक्तगटाला EMM निगेटीव्ह असे नाव ठेवलं आहे. दरम्यान, EMM हे लाल रक्तपेशींमधील एक ॲंटिजन आहे, हे रक्त सहजासहजी रक्तामध्ये मिसळत नाही. सोनेरी रंगाचे असलेले हे दुर्मिळ रक्त १९६१ मध्ये प्रथमच जगासमोर आले होते.