घोड़ा घास से दोस्ती कर ले तो खाएगा क्या? ही म्हण तर आपण अनेकदा ऐकतोच. पण अहो तुम्हाला माहित आहे का? गवताकडे वळूनही न पाहणारा सिंह चक्क गवत खाऊ लागला आहे. खरचं... तुम्हाला कदाचित विश्वास बसणार नाही. पण आम्ही खरचं सांगतोय. 'शेर कभी घास नही खाता' असं आपण ऐकलं आहे. पण हा सिंह खरखुरं गवत खाऊ लागला आहे. सिंहाचा गवत खातानाचा व्हिडीओ सध्या इंटरेटवर व्हायरल होत आहे. पण हा सिंह गवत का खात आहे? या प्रश्नाचं उत्तर मात्र कोणालाच समजतं नाही.
सिंहाचा गवत खातानाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेक लोक हा व्हिडीओ शेअर करत आहेत. व्हिडीओमध्ये असं दिसून येत आहे की, हा सिंह गवत खात आहे. आतापर्यंत आपण या जंगलाच्या राजाला एखाद्या शाकाहारी प्राण्याची शिकार करून खाताना पाहिलं आहे. पण हा सिंह स्वतःच शाकाहारी जाला की काय असा प्रश्न तुम्हाला व्हिडीओ पाहून नक्कीच पडेल.
व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी आपल्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. त्यातील एकाने लिहिलं आहे की, तुम्ही कधी सिंहाला गवत खाताना पाहिलं आहे का?, तर दुसऱ्याने लिहिलं आहे की, 'सिंह गवत कसा काय खातोय? तो ठिक आहे ना?
गुजरात फॉरेस्ट डिपार्टमेंटने ट्विट करून सिंह नक्की गवत का खात आहे यामागील कारण सांगितलं आहे. त्यांनी सांगितलं की, 'जेव्हा सिंहाला पोटाच्या समस्या सतावू लागतात. त्यावेळी तो उलटी करण्यासाठी गवत खाऊ लागतो.' तसेच त्यांनी सांगितलं की, हा व्हिडीओ खंभा जंगलातील आहे, जिथे सिंह गवत खाताना दिसून आला आहे.
आपणही बऱ्याचदा पाहिलं आहे किंवा ऐकलं आहे की, कुत्रे किंवा मांजर पोट खराब झाल्यावर गवत खातात. तसचं सिंहानेही पोट खराब झाल्यामुळे गवत खाल्लं आहे.
नेटकऱ्यांनी कमेंटमध्ये लिहिलं की, 'मला खरचं फार वाईट वाटतं आहे. पण कदाचित कुत्र्याप्रमाणे पोट खराब असल्यामुळेच तो गवत खात असावा.
व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये सिंहाला गवत खाताना पाहून अनेक लोकांना आश्चर्य वाटलं असेल. पण वन्य प्राण्यांमध्ये असं करणं अत्यंत सामान्य आहे.