गेल्या चार महिन्यांपासून जगभरासह भारतात पसरत असलेल्या कोरोनाच्या माहामारीनं सगळ्यांनाच स्वच्छतेचं महत्व पटवून दिलं आहे. आधीपेक्षा लोक आता आरोग्यांची काळजी जास्त घेत आहेत. मास्क आणि सॅनिटायजरचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. सध्या सॅनिटायजरची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. कारण कोरोनाशी लढण्यासाठी प्रत्येकाच्या खिशात सॅनिटायजर असतं.
जगभरात वेगवेगळ्या कंपन्याचे सुगंधित सॅनिटायजरर्स उपलब्ध होत आहेत. तरीसुद्धा काही लोक सॅनिटायजर विकत घेण्याचे कष्ट घेत नाहीत. कारण कुठूनही मागून हाताला सॅनिटायजर लावल्यानं वेळ निघून जातेय. अशाच एक प्रकार कॅमेरात कैद झाला आहे. सदर प्रकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ फेसबुकवर Kondotty Abu या सोशल मीडिया युजरने शेअर केला आहे. गुरुवारी हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला होता.
सोशल मीडिया युजर्सनी या फोटोवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे. या व्हिडीओत तुम्हाला या माणसाच्या हावभावावरून तो चोरी करण्याच्या विचारात असल्याचं सहज लक्षात येईल. या व्हिडीओला ८ हजारांपेक्षा जास्त लाईक्स असून २ हजारांपेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. तर ५०० पेक्षा जास्त कमेंट्स आल्या आहेत.
तुम्ही या व्हिडीओमध्ये पाहू शकताही खूप चालाखीने आपल्या लुंगीतून सॅनिटायजरची रिकामी बाटली काढत भरलेल्या बाटलीतून सॅनिटायजर आपल्या बॉटलमध्ये भरत आहे. नंतर या चोराचं लक्ष कॅमेराकडे जातं. त्यानंतर हा चोर पुन्हा मास्क लावतो आणि चोरलेली बॉटल पुन्हा जिथल्या तिथं ठेवतो. सोशल मीडियावर हा व्हिडीयो पाहिल्यानंतर अनेकांना संताप अनावर झाला आहे.
हे पण वाचा-
रिअल हिरो! ...अन् कोरोनायोद्ध्यानं स्वतःचा ऑक्सिजन काढून वाचवले वृद्धाचे प्राण
बोंबला! घरामागच्या विहिरीत अडकला हा लठ्ठ माणूस, १२ लोक मिळूनही काढू शकले नाही बाहेर!
अरे व्वा! २३ वर्षीय पठ्ठ्यानं रिक्षात तयार केलं बंगल्यापेक्षा भारी घर; पाहा आतून कसं दिसतं