शाळा, कॉलेज किंवा ऑफिसचं आयडी कार्ड विसरण्याची सवय अनेकांना असते. खासकरून ऑफिसला जाणाऱ्यांनी आयडी कार्ड विसरणे म्हणजे त्यांची त्या दिवसाची गैरहजेरी लागणंच आहे. अशाच सवयीला कंटाळून व्हिएतनाममध्ये एका तरूणाने भन्नाट आयडियाची कल्पना लढवली आहे. हा तरूण नेहमीच त्याचं आयडी कार्ड विसरायचा. त्यामुळे त्याला दारूच्या दुकानात फारच अडचणीचा सामना करावा लागत होता. त्याला आयडी नसल्याने कुणी दारू देत नव्हतं.
हातावर आयडीचा टॅटू
स्वत:च्या सततच्या आयडी विसरण्याच्या सवयीने हा तरूण चांगलाच कंटाळला होता. हा जरा नाही जरा जास्त विचित्रपणा आहे. पण जगभरातील लोक याची चर्चा करत आहेत. या तरूणाने त्याच्या हातावर आयडीचा टॅटू काढला आणि त्याचे फोटो व्हिएतनाममध्ये सोशल मीडियावर झाले आहेत.
असं का केलं?
त्याच्या मित्रांनी सांगितले की, टॅटूची आयडिया तेव्हा आली जेव्हा सर्व मित्र एका क्लबमध्ये गेले होते. क्लबवाल्यांनी दारू देण्यास नकार दिला. कारण ज्याने हा टॅटू काढलाय तो त्याचं नॅशनल आयडी कार्ड घरीच विसरून आला होता.
आर्टिस्टने दिला होता नकार
हा तरूणी हो-चि-मिन्हचा राहणारा आहे. तर टॅटू काढणारा आर्टिस्ट नगुयेन वानने सांगितले की, 'जेव्हा त्याने मला आयडीचा टॅटू काढण्यास सांगितले तेव्हा मला आश्चर्य वाटलं. मी आधी त्याला नकार दिला. पण तो जातच नव्हता. नंतर एका तासाच्या मेहनतीनंतर मी त्याच्या हातावर टॅटू काढून दिला'.