निर्सगाच्या प्रकोपासमोर माणसाचे काही चालत नाही. निसर्गाने जर रौद्ररुप धारण केले तर माणसाने काही केले तरी तो ते थोपवू शकत नाही. इटलीतील नागरिक सध्या याचा प्रत्यय घेत आहेत. इटलीतल्या बर्फवृष्टीचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होतोय. त्यातलं भीषण रुप पाहुन तुमचाही थरकाप होईल...
इटलीमध्ये गारांचा जोरदार वर्षाव होतोय. सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडतोय. हा गारांचा वर्षाव इतका भयंकर आहे की येथील गाड्यांच्या काचा तुटतायत. बुलेटप्रुफ गाड्या असूनही त्यांच्या काचांची चांगलीच नासधूस झालीय. मिलान आणि नेपल्सच्या दरम्यान हा गारांचा वर्षाव होतोय. तिथे जोरदार पाऊसही सुरु आहे. गारांच्या वर्षावामुळे गाड्या हायवेवरच अडकल्या आहेत.
गार्डियन न्युजच्या यु ट्युब चॅनलवर याचा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. यात अशा काही गारा पडतायत जसे की बर्फाचे गोळे! या गारांमुळे गाडीच्या काचा तुटतानाही व्हिडिओत दिसत आहेत. दरम्यान टॅनक्रेडी पालमेरी या युजरने ट्वीटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यातही गारा धो-धो बरसताना दिसत आहेत. हवा पण इतकी जोरदार सुरु आहे की आजूबाजूची झाडे ही पडत आहेत. ९०० पेक्षा जास्त लोकांना या गारांच्या वर्षावामुळे व धुवाँधार पावसामुळे सुरक्षित स्थळी हलवावे लागले.