अभिमानास्पद! डोळ्यांनी दिसत नसतानाही १२ वीत मिळवले ५०० पैकी ४९६ गुण 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2022 05:32 PM2022-07-26T17:32:18+5:302022-07-26T17:36:22+5:30

केरळमधील एका अपंग विद्यार्थीने १२ वी च्या परीक्षेत भरघोस यश मिळवून आदर्श निर्माण केला आहे.

Hannah from Kochi, Kerala is visually impaired and scored 496 out of 500 in Class 12 | अभिमानास्पद! डोळ्यांनी दिसत नसतानाही १२ वीत मिळवले ५०० पैकी ४९६ गुण 

अभिमानास्पद! डोळ्यांनी दिसत नसतानाही १२ वीत मिळवले ५०० पैकी ४९६ गुण 

Next

कोची : एखाद्याने ठरवले तर त्याच्यासाठी कोणतीच गोष्ट अशक्य नसते असे बोलले जाते. माणसाला यशस्वी व्हायचे असेल तर कोणतेच संकट अडवू शकत नाही याचाच प्रत्यय देणारी एक घटना चर्चेचा विषय बनली आहे. कारण केरळ राज्यातील १९ वर्षीय मुलीने अशक्य गोष्ट शक्य करून सर्वांचे लक्ष वेधले आहे. कोचीमध्ये राहणारी विद्यार्थी हना एलिस सायमन (Hannah Alice Simon)हिने १२ वीच्या CBSE बोर्ड परीक्षेत ५०० पैकी ४९६ गुण मिळवले आहेत. डोळ्यांनी अपंगत्व असताना देखील तिने मिळवलेल्या यशाचे खूप कौतुक होत आहे. 

हना अपंग असून देखील तिने प्रथम क्रमांक पटकावला आहे. डोळ्याने अपंगत्व असताना हनाने ५०० पैकी ४९६ गुण प्राप्त केल्याने तिच्या पराक्रमाची मोठी चर्चा रंगली आहे. हनाला 'मायक्रोफ्थाल्मिया' (Microphthalmia) झाल्यामुळे डोळ्यांचे अपंगत्व आले आहे, तरीदेखील तिने भरघोस यश मिळवून सतत कारणे देणाऱ्यांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे. हना एक मोटिवेशनल स्पीकर, गायक आणि युट्यूबर देखील आहे.

हनाची प्रेरणादायी कथा

१९ वर्षीय हनाचा जन्म केरळमधील कोची येथे झाला होता. ती किक्कनडच्या राजगिरी क्रिस्टू जयंती पब्लिक स्कूलची विद्यार्थी असून तिने 'वेलकम होम' नावाचे एक पुस्तक देखील लिहले आहे. हनाच्या आई-वडिलांनी तिला अपंग मुलांच्या शाळेत घालण्याऐवजी सामान्य मुलांच्या शाळेत घातले, जेणेकरून महाविद्यालयीन काळात अभ्यासाचा जास्त ताण जाणवणार नाही असे हनाने सांगितले. 

आई-वडिलांनी दिला आत्मविश्वास 

हनाला अनेकवेळा धमकी देण्यात आली जसजशी ती पुढे जात गेली तसतसा तिच्यासोबत दुजाभाव वाढत गेला. यानंतर देखील तिने हार न मानता आपल्या ध्येयाच्या दिशेने पाऊले उचलली. तिला कल्पना होती की आपण जसजसे पुढे जाऊ तसतशी आव्हाने वाढतच जाणार आहेत. लहानपणापासून सतत संकटांचा सामना करत आल्यामुळे तिला अशा आव्हानांची सवय झाली होती. मात्र तिच्या आई-वडिलांनी तिच्यासोबत कोणताही दुजाभाव न करता आपल्या मुलीच्या पाठीशी ते खंबीरपणे उभे राहिले. हनाला आणखी एक बहिण आणि एक भाऊ आहे. हनाला अपंगत्व असले तरी ती ते सर्वकाही करू शकते जे इतर मुले करतात असे तिचे आई-वडिल सतत म्हणत असे हनाने सांगितले. 


 

Web Title: Hannah from Kochi, Kerala is visually impaired and scored 496 out of 500 in Class 12

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.