उत्तराखंडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील हरिद्वार जिल्ह्यातील एक व्यक्तीचा कॅन्सरने मृत्यू झाला. नातेवाईक अंतिम संस्कार करण्याच्या तयारीला लागले,मृतदेह स्मशानभूमीत घेऊन जाण्याची तयारी झाली. मृतचदेहाला शेवटची अंघोळ घालण्याची तयारी झाली. एवढ्यात तो मृत असलेला व्यक्ती जागा झाला. त्या व्यक्तीला जीवंत पाहून अनेकांना धक्का बसला.
नातेवाईकांनी त्या व्यक्तीला लगेच रुग्णालयात दाखल केले. पण, रुग्णालयात पोहोचेपर्यंत त्या व्यक्तीचा पुन्हा मृत्यू झाला आणि तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
पिवळ्या रंगाच्या साडीमध्ये तरूणीचा डान्स पाहून फिदा झाले लोक, म्हणाले - काजोलही फेल...
हे प्रकरण रुरकीच्या झाब्रेडा शहराशी संबंधित आहे. दीपक कुमार (५८) दीर्घकाळ कर्करोगाशी झुंज देत होते. सोमवारी सकाळी दीपकची प्रकृती अचानक बिघडली. नातेवाईकांनी त्याला रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. मृत्यूची बातमी कळताच कुटुंबात शोककळा पसरली. दीपकच्या अंतिम दर्शनासाठी नातेवाईकांना बोलावून घेतले.
दीपकचा मृतदेह स्मशानभूमीत नेण्याची तयारी सुरू होती. मृतदेहाला शेवटची आंघोळ घातली जात असताना दीपक उठला आणि लोकांना हे करताना पाहून म्हणाला, हे सर्व काय करताय? हे दृश्य पाहून तेथे उपस्थित लोकांना उक्का बसला. लगेच दीपकला रुरकी रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथे डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्याला मृत घोषित केले.
त्यानंतर मृतदेह घेऊन नातेवाईक गावात पोहोचले, त्यानंतर ग्रामस्थांची गर्दी झाली. दुपारी नातेवाईकांनी मृतदेहावर अंत्यसंस्कार केले.