शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
2
"...तर ईश्वर आम्हाला माफ करणार नाही", 'हिट अ‍ॅण्ड रन' घटनेवर उच्च न्यायालय काय म्हणाले?
3
“संभाजीराजेंना ओबीसींचा द्वेष, मतांच्या बेरजेसाठी मनोज जरांगेंना भेटले”; कुणी केली टीका?
4
सरपंच-उपसरपंचांच्या वेतनात वाढ, ग्रामसेवक पदाचं नाव बदललं; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
5
देशातील रोजगार वाढले, जुलै 2024 मध्ये EPFO मध्ये जोडले गेले 19.94 लाख नवीन सदस्य
6
Rishabh Pant नं शेअर केली बांगलादेशची फिल्ड सेट करण्यामागची Untold Story
7
हरियाणात काय परिस्थिती? ९० जागांपैकी १६-१८ भाजपा जिंकणार? उरलेल्या आप की काँग्रेस...
8
गिरीश महाजनांविरोधात शरद पवारांचा उमेदवार ठरला! जयंत पाटलांकडून शिक्कामोर्तब
9
"आता सर्व काही शुद्ध झाले आहे…", तिरुपती मंदिरातील शुद्धीकरण विधींबाबत पुजाऱ्याचे भाष्य
10
लोकलमध्ये सापडली नोटांनी भरलेली बॅग, रक्कम पाहून पोलीसही अवाक्, तपास सुरू
11
“मिस्टर संभाजी भोसले, ही रयत तुम्हाला राजा मानणार नाही”; लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
12
तिरुपती बालाजी मंदिराचे शुद्धीकरण, भगवान व्यंकटेश्वर स्वामींची मागितली माफी
13
Airtel New Recharge Plans: एअरटेलनं लाँच केले ३ नवे प्लॅन्स; रिचार्ज करण्यापूर्वी एकदा पाहाच, काय आहे खास?
14
टीम इंडियानं पाडला बांगलादेशचा बुक्का; मग चव्हाट्यावर आला पाक क्रिकेटमधील 'मॅटर'; जाणून घ्या सविस्तर
15
"त्याला आवर घालायचे काम तुमच्याकडून..."; नितेश राणेंच्या भाषेवरून शरद पवार संतापले, भाजपाला सुनावले
16
युक्रेन युद्धादरम्यान रशियाला मोठा धक्का, चाचणीदरम्यान फुटलं महाक्षेपणास्त्र
17
तिरुपती लाडू वाद: सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल; तपास समिती स्थापन करण्याची मागणी
18
डेटिंग अ‍ॅपवरून ओळख, मुलावर जडलं प्रेम अन् एका फोनमुळे गमावले लाखो रुपये...
19
महिलांसाठी मोठी बातमी: लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता कधी मिळणार?; नवी माहिती समोर
20
डॉक्टर व्हायचेय, पण बजेट २० लाख आहे, मग या देशात होऊ शकता MBBS

गुगलने स्टार परफॉर्मर बनलेल्या तरुणाला नोकरीवरून काढले, सोशल मीडियावर लिहिलेली पोस्ट होतेय व्हायरल!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2023 8:33 PM

गुगलने काढून टाकण्यात आलेल्या कर्मचार्‍यांमध्ये हैदराबाद येथील हर्ष विजयवर्गीय यांचा समावेश आहे, जे 'स्टार परफॉर्मर ऑफ द मंथ' देखील होते.

गेल्या काही महिन्यांत अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांची कपात केली आहे. गुगलने जवळपास 12 हजार कर्मचारीही काढले आहेत. गुगलने कर्मचाऱ्यांना डेस्क शेअर करण्यास सांगितले होते, जेणेकरून ऑफिस कमी जागेत चालवता येईल. दरम्यान, गुगलने काढून टाकण्यात आलेल्या कर्मचार्‍यांमध्ये हैदराबाद येथील हर्ष विजयवर्गीय यांचा समावेश आहे, जे 'स्टार परफॉर्मर ऑफ द मंथ' देखील होते. हर्ष यांची एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

निराशा व्यक्त करत हर्ष यांने लिहिले आहे की, "मला कंपनीकडून एक मेल आला आहे, ज्यामध्ये मला कामावरून काढून टाकण्यात आले आहे. मला या कंपनीत काम करताना खूप आनंद झाला. मला खूप अभिमान वाटायचा, पण 'माझा पहिला प्रश्न होता 'मी का'?, जेव्हा मी महिन्याचा स्टार परफॉर्मर होतो, मग मी का? आणि याचे उत्तर काहीच नव्हते." दरम्यान, हर्ष विजयवर्गीय यांची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

याचबरोबर, पोस्टमध्ये हर्ष यांनी लिहिले आहे की, नोकरी गेल्याने माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर खूप परिणाम झाला आहे. मला पाच दिवस ऑफिस असायचे आणि ऑफिसला जायची सवय होती, आता मी घरी आहे. मला एक मूल आणि पत्नी आहे, जी नेहमी माझ्यासोबत असते. गेल्या दोन महिन्यांपासून मला अर्धा पगार मिळत होता, त्याचा माझ्या आयुष्यावर खूप परिणाम झाला आहे. यानंतरही अचानक कंपनीतून काढून टाकल्याचा मेल आल्याने मी हैराण झालो.

दरम्यान, हर्ष विजयवर्गीय यांनी सांगितले की, ते स्टार परफॉर्मर होता, तरीही त्यांना कंपनीतून काढून टाकण्यात आले. सोशल मीडियावर त्यांच्या या पोस्टवर अनेक जण आश्चर्य व्यक्त करत आहेत. एका यूजरने लिहिले की, लवकरच तुम्हाला चांगली नोकरी मिळेल. तर दुसर्‍या युजरने लिहिले की, आजकाल नोकरीची शाश्वती नाही, जेव्हा स्टार परफॉर्मरला काढून टाकले जाते, तेव्हा कोण टिकेल?

यापूर्वी गुगलने जवळपास 12000 हजार कर्मचाऱ्यांची कपात केली आहे. कर्मचाऱ्यांच्या कपातीबाबत कंपनीचे सीईओ सुंदर पिचाई म्हणाले होते की, कर्मचाऱ्यांच्या कामगिरीच्या आधारे ही कपात करण्यात आली आहे. यासोबतच, या कपातीची संपूर्ण जबाबदारीही त्यांनी घेतली होती. कंपनीच्या भल्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे ते म्हणाले होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंपनीने नोकरी गमावलेल्यांना पगार देण्याचे आश्वासनही दिले आहे.

टॅग्स :googleगुगलtechnologyतंत्रज्ञान