बँकेशी निगडीत व्यवहार आपला आयुष्यातील एक महत्वाचा घटक आहे. रोज अनेक लोक बँकेशी जोडलेले हजारो व्यवहार करतात. अनेकदा बँक, कर्ज, हफ्ते डोकेदुखीचं कारण ठरतात. हरियाणातील कुरुक्षेत्रमध्ये अशी एक घटना समोर आली आहे. ही घटना वाचून तुम्ही नक्कीच विचारात पडाल. एका चहा विक्रेत्याला बँकेने ५० कोटी रुपयांचं डिफॉल्टर घोषित केले आहे. तुम्हाला प्रश्न पडला असेल चहावाल्याने एवढं लोन खरचं घेतंल असेल का? तुमचा विश्वास बसणार नाही पण हे ऐकून या चहावाल्याची झोप उडाली आहे. हे डिफॉल्टर पाहून चहावाल्यानं 'मी कधी लोन घेतलंच नाही' अशी प्रतिक्रिया दिली आहे.
वृत्तसंस्था एएनआयने दिलेल्या माहितीनुसार या चहा वाल्याचे नाव राजकुमार असं आहे. राज कुमारने सांगितले की, ''मी बँकेत कर्ज घेण्यासाठी निवेदन दिले होते. कोरोनाच्या संकटकाळात माझी आर्थिक स्थिती खूपच खालावली होती. तरिही बँकेने कर्ज देण्यास नकार दिला आणि माझ्यावर आधीच ५० कोटींच कर्ज असल्याचे कारण सांगितले. पण हे कसं शक्य आहे. कारण मी आत्तापर्यंत कर्ज घेतलेलं नाही. ''
राजकुमार हरिणायातील कुरुक्षेत्रमध्ये आपलं चहाचं दुकान लावतात. यातून मिळत असलेल्या कमाईतून ते आपलं घर चालवतात. कोरोनाच्या माहामारीत त्यांच्या या धंद्याचं खूप नुकसान झालं. त्यामुळे या चहावाल्या गृहस्थाची आर्थिक स्थिती खूपच बिकट होती. पैशांची कमतरता भासल्याने त्यांनी बँकेतून कर्ज काढण्यासाठी निवेदन देले पण डिफॉल्टर बनवून बँकेने या चहावाल्याचे निवेदन नाकारले.
दरम्यान कोरोनाच्या माहामारीत जगभरातील लोकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. कोरोनाच्या संकटात लॉकडाऊन केल्यामुळे अनेकांचे कामधंदे जवळपास दोन ते तीन महिने बंद होते. अशा स्थितीत लोकांकडचे पैसै संपल्याने कोरोनाचा प्रसार आणून आपापले कामधंदे कधी सुरू होतील याची सगळ्यांनाच प्रतिक्षा आहे. अशा स्थितीत हरियाणातील या घटनेने मात्र बँकेच्या व्यवहारांवर आणि कार्यपद्धतींवर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित केला आहे.
सेल्यूट! २४ तासांची शिफ्ट केलेल्या डॉक्टरच्या चेहऱ्याची अवस्था पाहून तुम्हीही ठोकाल सलाम
त्रिवार सलाम! भर पावसात अडकली रिक्षा; संकटकाळात खाकीतल्या देवदूताने केली रक्षा