वैशाली: बिहारमधील वैशालीच्या राघोपूरमध्ये एका माहुताने हत्तीच्या पाठीवर बसून गंगा पार केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मंगळवारी गंगा नदीत अचानक पाणी वाढल्याने राघोपूर परिसरात माहूत हत्तीसह अडकला. यानंतर माहूतने हत्तीसह गंगा पार करण्याचा निर्णय घेतला. माहुताने हत्तीच्या पाठीवर बसून नदी पार केली. यादरम्यान लोकांनी त्याचा व्हिडिओही बनवला.
हत्तीचा कान धरून बसलागंगेच्या जोरदार लाटांमधून हत्ती पोहत होता. यादरम्यान, जीव मुठीत धरलेल्या माहुताने हत्तीचे कान धरले. या दोघांनी नदीच्या लाटांचा सामना करत नदी पार केली. सुमारे एक किलोमीटर गंगेत पोहल्यानंतर हत्ती आणि माहुत सुरक्षितपणे गंगा पार करून जेठुकी घाटावर आले.
माहुताकडे ना पैसा होता ना अन्नस्थानिक लोकांनी सांगितले की, मंगळवारी माहुत हत्ती घेऊन आला होता. अचानक गंगेचे पाणी वाढले आणि दोघेही अडकले. हत्तीला वाचवण्यासाठी मोठ्या बोटीची गरज होती. पण, माहुताकडे फारसे पैसे नव्हते. यामुळेच त्याने हत्तीसोबत नदी पार करण्याचा निर्णय घेतला.