'तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आजादी दूंगा....! जय हिंद!' हा नारा आजही ऐकला तर मनाला एक ऊर्जा देतो. असं वाटतं हा नारा सुभाष चंद्र बोस यांनी निरंतर काळासाठी दिला आहे. आज त्यांची १२५ जयंती साजरी केली जात आहे. नेताजी सुभाष चंद्र बोस भारतातील महान स्वातंत्र्य सेनानी होते. तरूण लोक त्यांच्याकडून प्रेरणा घेतात. त्यांच्या जयंतीनिमित्ताने ट्विटरवर त्यांचं एक पत्र व्हायरल होत आहे.
हे आहे ते पत्र जे नेताजी सुभाष चंद्र बोस यांचं हस्तलिखित आहे. हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. परवीन कासवान जे एक आयएफएस अधिकारी आहेत त्यांनी हे पत्र शेअर केलं आहे. कॅप्शनला त्यांनी लिहिले की, '२२ एप्रिल १९२१ मध्ये नेताजींनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात भाग घेण्यासाठी इंडियन सिव्हिल सर्व्हिसेसचा राजीनामा दिला होता. त्यावेळी ते २४ वर्षांचे होते. आपल्या अखेरच्या श्वासापर्यंत त्यांनी देशाची सेवा केली. त्यांना नमन'.
नेताजी सुभाष चंद्र बोस यांचा जन्म २३ जानेवारी १८९७ ला ओरिसामधील बंगाल डिविजनच्या कटकमध्ये झाला होता. त्यांच्या वडिलांचं नाव जानकीनाथ बोस आणि आईचं नाव प्रभावती होतं. वडील कटक शहरातील प्रसिद्ध वकिल होते. प्रभावती आणि जानकीनाथ यांना एकूण १४ अपत्ये होती. ज्यात ६ मुली आणि ८ मुलांचा समावेश होता. सुभाष चंद्र बोस हे त्यांचं ९वं अपत्य होते आणि पाचवा मुलगा होते.