निळ्या आणि पांढऱ्या रंगाची स्लिपर चप्पल तुम्ही पाहिली असेलच. तुम्ही घरात किंवा बाथरूमला जाताना ही चप्पल वापरतही असाल. 50 ते 100 रूपयात ही चप्पल आरामात मिळते. पण सध्या सौदी अरबमधील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यात ही स्लिपर किंवा हवाई चप्पल 1 लाख रूपयांना विकली जात असल्याचं दाखवलं आहे.
एका रिपोर्टनुसार, सौदी अरबमध्ये महागाई इतकी आहे की, इथे स्लिपर चप्पल दागिने किंवा इतर महागड्या वस्तूसारख्या काचेच्या शोकेसमध्ये ठेवून विकल्या जात आहेत. पण या चपलेची किंमत इतकी आहे की, कुणीही ती खरेदी करण्याआधी दहा वेळा विचार करेल.
सौदी अरबमध्ये ही चप्पल 1 लाख रूपयांपेक्षाही जास्त किंमतीत विकली जात आहे. ट्विटर यूजर @rishibagree ने सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट केला आहे. व्हिडीओत दुकानदार चप्पल काचेच्या शेल्फमधून काढताना दिसत आहे. मग तो ग्राहकासमोर चप्पल ठेवतो. या चपलेची किंमत 4500 रियालच्या आसपास आहे.
हा व्हिडीओ आता व्हायरल झाला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत 18 लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. बऱ्याच लोकांनी यावर अनेक मजेदार कमेंट्स केल्या आहेत. एकाने लिहिलं की, "भारतीयांनी याचा फायदा उचलून या चपला 100 रूपयात खरेदी करू सौदीमध्ये 4500 रियालमध्ये विकल्या पाहिजे". तर दुसऱ्याने लिहिलं की, "ही चप्पल ते बाथरूममध्ये जाण्यासाठी वापरतात".